IPL 2023 : चेन्नई विरुद्धच्या सामन्यात गुजरातची हॅटट्रिक, 15 वर्ष जुन्या राजस्थानच्या रेकार्डची बरोबरी
GT vs CSK, IPL 2023 : गुजरातने सलग तिसऱ्यांदा चेन्नईचा पराभव केला आहे. आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्धच्या सामन्यात गुजरातने हॅटट्रिक केली आहे.
CSK vs GT, IPL 2023 Match 1 : इंडियन प्रीमियर लीग 2023 ला (Indian Premier League) धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. हंगामाच्या पहिल्याच दिवशी सलामी सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) धूळ चारली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने धोनीच्या चेन्नई संघावर (Chennai) पाच विकेट्सने विजय मिळवला. सलामी सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat) विजयी सुरुवात केली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या चेन्नईचा डाव 178 वर आटोपला. यानंतर 19.2 दोन चेंडून गुजरातने 178 धावांचा पल्ला गाठत चेन्नईवर सहा गडी राखून विजय मिळवला.
GT vs CSK, IPL 2023 : चेन्नईविरुद्धच्या सामन्यात गुजरातची हॅटट्रिक
गतविजेत्या गुजरात टायटन्सने यंदाच्या मोसमाची सुरुवातही विजयासह दणक्यात केली. चेन्नईविरुद्ध या विजयासह गुजरातने आयपीएलमध्ये नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. गुजरातने सलग तिसऱ्यांदा चेन्नईचा पराभव केला आहे. आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्धच्या सामन्यात गुजरातने हॅटट्रिक केली आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात (IPL 2022) गुजरातने सलग दोन सामन्यांमध्ये चेन्नईला हरवला. त्यानंतर शुक्रवारी गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या तिसऱ्या विजयासह मोठा विक्रम केला आहे.
GT vs CSK, IPL 2023 : गुजरातकडून सलग तिसऱ्यांदा चेन्नईचा पराभव
आयपीएलच्या इतिहासात एखाद्या संघाने त्यांच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा पराभव करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी एकच संघ अशी कामगिरी करू शकला आहे. त्यानंतर आता चेन्नईला सलग तीन सामन्यांमध्ये हरवत दमदार कामगिरी करणारा गुजरात टायटन्स हा दुसरा संघ ठरला आहे.
GT vs CSK, IPL 2023 : पहिल्या मोसमातील राजस्थानच्या विक्रमाशी बरोबरी
राजस्थान रॉयल्सने याआधी 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्सला पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभूत केलं होतं. आयपीएल 2008 मध्ये राजस्थान रॉयल्सचं कर्णधारपद ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नकडे होतं. 2008 साली आयपीएलचा पहिलाच मोसम होता. यावेळी राजस्थान रॉयल्सचा संघही चॅम्पियन ठरला होता. आता 15 वर्षांनंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाच्या त्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएल 2022 च्या दोन्ही सामन्यांमध्ये गुजरातने CSK चा पराभव केला आणि त्यानंतर आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यातही चेन्नईविरुद्धच्या सामन्यात गुजरातने विजय मिळवला.
GT vs CSK, IPL 2023 : गुजरातचा चेन्नईवर पाच विकेट्सने विजय
चेन्नईने दिलेले 179 धावांचे आव्हान गुजरातने चार चेंडू आणि पाच विकेट राखून पूर्ण केलं. चेन्नईकडून राजवर्धन हंगरगेकर याने पदार्पणाच्या सामन्यातच चांगली कामगिरी करत सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तुषार देशपांडे आणि जाडेजा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. शुभमन गिल याने 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर मोक्याच्या क्षणी राशिद खान याने तीन चेंडूत 10 धावांची खेळी केली. शुभमन गिलच्या अर्धशतकानंतर राशिद खान याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर गुजरातने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :