IPL 2023 : गुजरातची प्लेऑफच्या दिशेने आगेकूच, पाहा गुणतालिकेतील स्थिती
RR vs GT, IPL 2023 : गुजरातने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केलेय.
RR vs GT, IPL 2023 : जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium, Jaipur) गुजरातने हल्लाबोल केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने राजस्थानचा नऊ विकेटने दारुण पराभव केला. (Rajasthan Royals vs Gujarat Titans) संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. पण राशिद खान आणि नूर अहमद यांच्या फिरकीपुढे 17.5 षटकात राजस्थानचा डाव 118 धावांत संपुष्टात आला. 119 धावांचे माफक आव्हान गुजरातने 37 चेंडू आणि नऊ विकेट राखून सहज पार केले. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केलेय. गुजरातचा हा सातवा विजय होय.. 14 गुणांसह गुजरात संघाने आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केलेय.
गुजरातने 10 सामन्यात सात विजय मिळवले आहेत. 14 गुणासह गुजरातने अव्वल स्थान मजबूत केलेय. राजस्थानविरोधातील सामन्यापूर्वीही गुजरात संघ अव्वल होते. पण आता यामध्ये आणखी दोन गुणांची भर पडली आहे. त्याशिवाय नेटरनरेटही मजबूत झालाय. गुजरातकडून पराभव झाल्यानंतर राजस्थानच्या संघाचा नेटरनरेट घसरलाय... राजस्थान संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे.. पण नेटरनरेट घसरला आहे. राजस्थान संघाचे 10 सामन्यात 10 गुण आहेत.
IPL 2023 Points Table - If RCB and MI wins tomorrow, they'll enter the Top 4. pic.twitter.com/vEUVTCSFON
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 5, 2023
लखनौ संघाने 10 पैकी पाच सामने जिंकले असून संघाकडे 11 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई संघानेही 10 पैकी पाच सामने जिंकले असून संघाकडे 11 गुण आहेत. चौथ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स आहे. राजस्थान संघाने आतापर्यंत दहा सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ गुणतालिकेत अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. बंगळुरुकडे 10 गुण असून संघाने नऊपैकी पाच सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्स सहाव्या क्रमांकावर आहे. संघाने आतापर्यंतच्या नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. पंजाब संघ 10 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. तर, आठव्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता संघाकडे 10 गुण आहेत. कोलकाता संघाने दहा पैकी चार सामने जिंकले आहे. हैदराबाद संघ सहा गुणांसह नवव्या स्थानावर असून संघाने नऊपैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत सर्वात शेवटी दिल्ली कॅपिटल्स असून संघाकडे सहा गुण आहेत. दिल्लीने आतापर्यंतच्या नऊपैकी फक्त तीन सामन्यांत विजय मिळवला आहे.
राहुलची रिप्लेसमेंट लखनौला मिळाली, कसोटीत 300 धावांची खेळी करणाऱ्याला घेतले ताफ्यात