एक्स्प्लोर

IPL 2023 : 'या' महागड्या खेळाडूंकडून संघाची निराशा, कोट्यवधींचा खर्च करुनही ठरले फ्लॉप

Expensive Players Poor Performance in IPL : आयपीएलमध्ये लाखो रुपयांना खरेदी केलेल्या खेळाडूंनी संघासाठी मोलाची कामगिरी केली. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च केलेले खेळाडू काही खास कामगिरी करू शकले नाहीत.

IPL 2023 Flop Expensive Players : इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) यंदाचा सोळावा हंगाम सुरु आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2023) विराट कोहली (Virat Kohli), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यासारखे स्टार खेळाडू त्यांच्या दमदार फॉर्ममध्ये परतले. त्यासोबत अनेक युवा खेळाडूंनी त्यांच्या चमकदार खेळीने सर्वांचं लक्ष वेधलं. लाखो रुपयांना खरेदी केलेल्या खेळाडूंनी संघासाठी मोलाची कामगिरी केली. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च केलेले खेळाडू काही खास कामगिरी करू शकले नाहीत.

IPL Flop Players : महागड्या खेळाडूंकडून संघाची निराशा

आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये काही संघांनी कोट्यवधींची किंमत मोजून खेळाडू विकत घेतले. त्यांच्या नावाला साजेशी अशी तर काहींना त्याहून जास्त मानधन मिळालं. पण करोडोंचा खर्च करून या खेळाडूंचा शो फ्लॉप ठरला. आयपीएल 2023 च्या हंगामासाठी संघांनी या खेळाडूंवर कोट्यवधी रुपये खर्च केले, परंतु हे खेळाडू संघांच्या विश्वासावर टिकू शकले नाहीत. या यादीत अनेक मोठ्या खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे.

सॅम करन - पंजाब किंग्स

सॅम करन इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. सॅम करनला पंजाब किंग्स संघने 18.50 कोटींना विकत घेतलं. पण, या अष्टपैलू खेळाडूची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. गोलंदाजीसोबतच इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने फलंदाजीतही निराशा केली. विशेष म्हणजे पंजाब किंग्सने सॅम करनला 17.50 कोटी रुपयांच्या किमतीला खरेदी केलं. ही आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक बोली आहे. पण सॅम करनला या किमतीला साजेशी खेळी करता आली नाही.

हॅरी ब्रूक - सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादने जवळपास 13 कोटी रुपये खर्च करून हॅरी ब्रूकचा संघात समावेश केला, मात्र या फलंदाजाने आपल्या कामगिरीने संघाची निराशा केली. हॅरी ब्रूक आयपीएल 2023 च्या हंगामात 11 सामन्यात केवळ 190 धावा करू शकला. त्यामुळे हॅरी ब्रूक हा महागडा खेळाडू सनरायझर्स हैदराबाद संघासाठी फ्लॉप ठरला.

जोफ्रा आर्चर - मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला आठ कोटी रुपयांना विकत घेतलं, पण दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धा खेळू शकला नाही. तो काही मोजके सामने वगळता इतर सामन्यांमध्ये बेंचवर होता. यापूर्वी जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे आयपीएल 2022 मध्ये खेळू शकला नव्हता. यंदाही तो आयपीएल 2023 संपण्याआधीच दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर गेला.

मुकेश कुमार - दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली कॅपिटल्सने वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला 5.50 कोटींना विकत घेतलं. दिल्ली कॅपिटल्सला मुकेश कुमारकडून उत्तम गोलंदाजीची अपेक्षा होती, पण या गोलंदाजाने संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांची निराशा केली.

बेन स्टोक्स - चेन्नई सुपर किंग्स

आयपीएल 2022 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने बेन स्टोक्सवर 16.25 कोटी रुपये खर्च करुन संघात सामील केलं होते. चेन्नई सुपर किंग्ज संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना या अष्टपैलू खेळाडूकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, पण दुखापतीमुळे तो यंदाच्या आयपीएलमधील बहुतांश सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. याशिवाय,  बेन स्टोक्स प्लेऑफच्या महत्त्वाच्या सामन्याआधीच आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे हा महागड्या खेळाडूनंही चेन्नई संघाची निराशा केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IPL 2023 : यंदाच्या आयपीएलमध्ये षटकारांचा पाऊस, सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-5 फलंदाजांची यादी पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishwajeet Kadam : आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
Thane Loksabha 2024: प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Chhagan Bhujbal: मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Rohit Pawar  Interview : आवडीचे खाणे, राजकीय ताणेबाणे;  रोहित पवार  यांच्यासोबत खास बातचीत ABP MajhaTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 28 April 2024 : ABP MajhaUjjwal Nikam : शत्रू राष्ट्रातदेखील भारताकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिम्मत नाही - उज्ज्वल निकमMNS vs Thackeray Group Ratnagiri : रत्नागिरीत मनसे आणि ठाकरे गटाला सभेच्या वेळेवरून 'ठसन'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam : आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
Thane Loksabha 2024: प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Chhagan Bhujbal: मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...
Vijay Shivtare : आता अजितदादांचा ऐका, आणखी किती दिवस शरद पवारांच्या नावाने मतं मागणार? विजय शिवतारेंनी रोहित पवार, सुप्रिया सुळेंना डिवचलं!
आता अजितदादांचा ऐका, आणखी किती दिवस शरद पवारांच्या नावाने मतं मागणार? विजय शिवतारेंनी रोहित पवार, सुप्रिया सुळेंना डिवचलं!
IPL 2024 Hardik Pandya: सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण शेवटी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?
सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण पराभवासाठी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?
Bollywood Actress : इंटिमेट सीन्सच्या विरोधात होते आई-वडील, अनेक चित्रपट नाकारले; 'लस्ट स्टोरीज 2' फेम अभिनेत्री म्हणाली,
इंटिमेट सीन्सच्या विरोधात होते आई-वडील, अनेक चित्रपट नाकारले; 'लस्ट स्टोरीज 2' फेम अभिनेत्री म्हणाली,"मला भीती वाटायची"
Embed widget