IPL 2023 GT vs DC : हार्दिक पांड्याची अर्धशतकी खेळी व्यर्थ, दिल्ली कॅपिटल्सचा गुजरातवर 5 धावांनी विजय
IPL 2023 GT vs DC : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capital) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाचा पाच धावांनी पराभव केला.
IPL 2023 GT vs DC : आयपीएल 2023 च्या 44 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) सामना दिल्ली कॅपिटल्सशी (DC) यांच्यात रंगला. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capital) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाचा पाच धावांनी पराभव केला. दिल्लीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली संघाने 20 षटकात आठ गडी गमावून 130 धावा केल्या. दिल्लीनं गुजरातला 131 धावांचं आव्हान दिलं होतं. फलंदाज गुजरातच्या गोलंदाजांच्या जाळ्यात पुरते अडकले. गुजरातचा फलंदाज मोहम्मद शमीनं दिल्लीच्या चार खेळाडूंनी तंबूत पाठवलं.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 130 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून 125 धावा करता आल्या. दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा पाच धावांनी पराभव केला आहे. हार्दिक पांड्याची अर्धशतकी खेळी व्यर्थ आहे. दिल्ली कॅपिटल्सने कमी धावसंख्येच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 5 धावांनी पराभव करत या मोसमातील तिसरा विजय नोंदवला. इशांत शर्माने गोलंदाजी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.
131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाची खराब सुरुवात झाली. ऋद्धिमान साहा डावाच्या पहिल्याच षटकात खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मोसमात आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलने अवघ्या 6 धावा केल्या आणि एनरीच नॉर्टजेकडून झेलबाद झाला. गुजरात संघाने आपले दोन्ही सलामीचे फलंदाज 18 धावांवर गमावले होते.
शेवटच्या तीन षटकात गुजरातला विजयासाठी 37 धावांची गरज होती. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर क्रीजवर होते. 18 व्या षटकात खलील अहमद गोलंदाजीसाठी आला. त्याने पहिल्याच चेंडूवर अभिनव मनोहरला बाद केले. या षटकात खलीलने चार धावा दिल्या. गुजरातला शेवटच्या दोन षटकात 33 धावांची गरज होती.
राहुल तेवतिया हार्दिकसोबत फलंदाजीला आला. यावेळी एनरीच गोलंदाजीसाठी आला. त्याने पहिल्या तीन चेंडूत तीन धावा घेतल्या. यानंतर तेवतियाने ओव्हरच्या शेवटच्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. नॉर्टजेने 19व्या षटकात 21 धावा दिल्या. अशा स्थितीत इशांत शर्मासमोर 12 धावा वाचवण्याचे लक्ष्य होते. त्याचवेळी तेवतिया आणि हार्दिक क्रीजवर होते.
इशांतने 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा दिल्या. दुसऱ्या चेंडूवर हार्दिकने एकच धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर तेवतियाला एकही धाव करता आली नाही. चौथ्या चेंडूवर इशांतने तेवतियाला रिले रुसोकरवी झेलबाद केले. सात चेंडूंत २० धावा करून तो बाद झाला. राशिद खानला पाचव्या चेंडूवर दोन धावा करता आल्या. त्याचवेळी रशीदने शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. अशाप्रकारे इशांतने केवळ सहा धावा केल्या आणि दिल्लीने पाच धावांनी सामना जिंकला.