(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 CSK vs GT: धोनी आणि हार्दिकमध्ये सलामीचा सामना, कशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग 11, कुणाला मिळणार संधी?
IPL 2023 CSK vs GT Playing 11 : आयपीएलचा रणसंग्राम सरु होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत.
IPL 2023 CSK vs GT Playing 11 : आयपीएलचा (IPL 2023) रणसंग्राम सरू होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 31 मार्च रोजी धोनीची चेन्नई (CSK) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. चेन्नई आणि गुजरात यांच्यातील सामन्याने आयपीएलच्या रसनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. मागील हंगामात दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने आले होते. दोन्हीवेळा गुजरातच्या संघाने बाजी मारली होती. यंदा चेन्नईची कमान धोनीच्या हातात आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघ विजेतेपदावर दावा करण्याची शक्यता आहे. तर हार्दिक पांड्या जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ चेन्नईविरोधात आपली विजयी लय कायम ठेवण्याच्या तयारीत असेल. पण गुजरातसठी ही लढाई सोपी नसेल. कारण, अनुभवी धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईचा संघ मजबूत दिसत आहे. गुजरातकडेही अनुभवी आणि नवीन खेळाडूंचा भरणा आहे. गतवर्षीपेक्षा गुजरातचा संघ मजबूत दिसत आहे. अशात हा सामना रंगतदार होणार,यात शंका नाही. गुजरातने मिनी ऑक्शनमध्ये केन विल्यमसवर डाव खेळला तर चेन्नईने अष्टपैलू बेन स्टोक्सला ताफ्यात घेतले.
गुजरातचा सलामी फलंदाज शुभमन गिल तुफान फॉर्मात आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याने शतकी खेळी गेली आहे. गेल्या हंगामातही गिलने धावांचा पाऊस पाडला होता. त्यातच यंदा केन विल्यमसनची साथ मिळाली आहे. विल्यमसनमुळे गुजरातची टॉप ऑर्डर अधिक मजबूत झाली आहे. हार्दिक पांड्या, डेविड मिलर, मॅथ्यू वेड आणि राहुल तेवातिया यांच्यासारख्या दमदार फलंदाजामुळे मध्यक्रम मजबूत दिसत आहे. गोलंदाजीत शामी आणि अल्जारी जोसेफ वेगनान जोडी आहे तर राशिद खान फिरकीची धुरा सांभाळेल,
चेन्नईसाठी मागील हंगाम खराब गेला होता. चेन्नईला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ चषक उंचावण्यासाठी मैदानात उतरेल. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनवे यांच्याकडून दमदार सलामी मिळेल. दोघांनी आतापर्यंत चेन्नईल विस्फोटक सलामी दिली आहे. अंबाती रायडू,मोईन अली आणि शिवम दुबे यांच्या जोडीला आता बेन स्टोक्सची साथ मिळणार आहे. त्याशिवाय रविंद्र जाडेजा लयीत दिसत आहे. चौकार षटकारांचा पाऊस पाडेल. तसेत धोनी आणि दीपक चाहर हेही धावांचा पाऊस पाडण्यास तयार आहेत. चेन्नई संघाचा फलंदाजीचा क्रम कसा असेल. बेन स्टोक्स कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गुजरातची प्लेईंग 11 कशी असेल?
शुभमन गिल, रिद्धिमान साहा, केन विल्यमसन, डेविड मिलर, हार्दिक पांड्या, विजय शंकर, मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटिल
चेन्नई सुपर किंग्सची प्लईं 11 कशी असेल?
डेवोन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोइन अली, शिवम दूबे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चाहर, मुकेश चौधरी, महेश तीक्षणा