IPL 2023: हैदराबादच्या सलामी सामन्यात भुवनेश्वर कुमार कर्णधार
Sunrisers Hyderabad : यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचा सलामीचा सामना दोन एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स संघाविरोधात होणार आहे.

Bhuvneshwar Kumar Captain Sunrisers Hyderabad : यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचा सलामीचा सामना दोन एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स संघाविरोधात होणार आहे. या सामन्याला हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम उपलब्ध नसेल. त्यामुळे संघाची धुरा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्या खांद्यावर असेल.. रिपोर्ट्सनुसार, एडन मार्करम अद्याप भारतात आलेला नाही. तो दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यात होणाऱ्या वनडे मालिकेत व्यस्त आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात संघाची कमान भुवनेश्वर सांभाळणार आहे.
आयपीएल 2023 साठी हैदराबादने संघाची धुरा एडन मार्करमच्या खांद्यावर सोपवली आहे. पण मार्करम सध्या नेंदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या वनडे मालिकेत व्यस्त आहे. त्यामुळे तो सुरुवातीच्या सामन्याला उपलब्ध नसेल. त्याच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार संघाची धुरा सांभाळणार आहे. आयपीएल उद्घाटनापूर्वी सर्व संघाच्या कर्णधाराचे फोटोशूट झाले, त्यामुळे हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार उपस्थित होता.
भूवनेश्वर कुमार याआधीही हैदराबाद संघाचा कर्णधार राहिला आहे. 2019 मध्ये सहा सामन्यात भुवनेश्वर कुमारने हैदराबादचे नेतृत्व केलेय. 2022 मध्ये एका सामन्यात तो कर्णधार राहिला आहे. 2013 पासून भुवनेश्वर कुमार हैदराबाद संघाचा सदस्य होता. भुवनेश्वर कुमारची कामगिरी आतापर्यंतची जबरदस्त राहिली आहे. त्याने आतापर्यंत 146 सामन्यात 154 विकेट घेतल्या आहेत. दरम्यान, मार्करम याने 2021 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 527 धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याने तीन अर्धशतके झळकावली आहेत. एक विकेटही घेतली आहे.
Game Face 🔛
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2023
ARE. YOU. READY for #TATAIPL 2023❓ pic.twitter.com/eS5rXAavTK
एडन मारक्रम हैदराबादचा कर्णधार -
2023 च्या हंगामासाठी दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मारक्रम याच्याकडे हैदराबाद संघानं कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. मारक्रमने नुकतीच दक्षिण अफ्रिका टी20 फ्रेंचायजी लीगमध्ये (SA20) सनरायजर्स फ्रेंचायजीचं नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात सनरायजर्स फ्रेंचायजीने जेतेपद पटकावलं होतं. हैदराबादच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत मारक्रमशिवाय भुवनेश्वर कुमार आणि मयांक अग्रवाल यांची नावे चर्चेत होती. दक्षिण आफ्रिकेचा हा अष्टपैलू खेळाडू अल्पवधीतच भारतात प्रसिद्ध झाला आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व केल्यामुळे कर्णधारपदाचा अनुभवही आहे. तसेच तो विश्वचषक जिंकणारा एकमेव दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे. मार्करम याने 2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेला अंडर 19 विश्वचषक जिंकून दिला होता.
सनरायजर्स हैदराबादचा आयपीएलसाठी संघ -
अभिषेक शर्मा, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडिन मारक्रम (कर्णधार), हॅरी ब्रूक, अब्दुल समद, अनमोलप्रीत सिंह, ग्लेन फिलिप्स, हेनरिक़ क्लासेन, उपेंद्र यादव, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, विव्रांत शर्मा, सनवीर सिंह, समर्थ व्यास, मयंक डागर, आदिल राशिद, मयंक मारकंडे, अकील हुसेन, भुवनेश्वर कुमार, मार्को यानसन, कार्तिक त्यागी, उमरान मलिक, टी नटराजन, फजलहक फारूकी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
