(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Auction: 80 खेळाडू मालामाल, 10 संघांनी खर्च केले 167 कोटी; तुमच्या आवडत्या संघात कोणता खेळाडू
IPL Auction 2023: लिलाव संपला, 80 खेळाडूंवर 167 कोटी खर्च; कुणावर बोली तर कोण अनसोल्ड, पाहा एका क्लीकवर
IPL Auction 2023: आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी कोची येथे लिलाव पार पडला. तब्बल सहा तास चाललेल्या या लिलावात 10 संघांनी 167 कोटी रुपये खर्च केले. या लिलावाचं वैशिष्ट्य म्हणजे अष्टपैलू खेळाडू होय... सॅम करन, बेन स्टोक्स, कॅमरुन ग्रीन यांना सर्वाधिक बोली लागली. तर अमित मिश्रा सर्वात जास्त वयाचा खेळाडू ठरला. या लिलावात 80 खेळाडू मालामाल झाले आहेत... पाहूयात कोणत्या संघानं कुणावर खर्च केले पैसे...
चेन्नई सुपर किंग्स- बेन स्टोक्स (16.25 कोटी), भगत वर्मा (20 लाख), अजय जादव मंडल (20 लाख), कायल जेमिसन (एक कोटी), निशांत सिंधू (60 लाख), शेख रशीद (20 लाख), अजिंक्य रहाणे (50 लाख).
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर- सोनू यादव (20 लाख), अविनाश सिंह (60 लाख), राजन कुमार (70 लाख), मनोज भंडागे (20 लाख), विल जॅक्स (3.2 कोटी), हिमांशु शर्मा (20 लाख), रीस टोप्ले (1.9 कोटी).
दिल्ली कॅपिटल्स- रिली रोसू (4.6 कोटी), मनीष पांडे (2.4 कोटी), मुकेश कुमार (5.5 कोटी), इशांत शर्मा (50 लाख), फिलिप साल्ट (2 कोटी).
मुंबई इंडियन्स- नेहाल वढेरा (20 लाख), शम्स मुलानी (20 लाख), विष्णु विनोद (20 लाख), डुआन जेंसन (20 लाख), पीयूष चावला (50 लाख), झाई रिचर्डसन (1.5 कोटी), कॅमरन ग्रीन (17.5 कोटी), राघव गोयल (20 लाख).
कोलकाता नाइट रायडर्स- मनदीप सिंह (50 लाख), लिटन दास (50 लाख), कुलवंत खेलरौलिया (20 लाख), डेविड विजे (1 कोटी), सुयश शर्मा (20 लाख), नारायण जगदीशन (90 लाख), वैभव अरोरा (60 लाख), शाकिब अल हसन (1.5 कोटी).
राजस्थान रॉयल्स- आकाश वशिष्ठ (20 लाख), मुरुगन अश्विन (20 लाख), केएम आसिफ (30 लाख), एडम जॅम्पा (1.5 कोटी), कुनाल सिंह राठौर (20 लाख), डोनावोन फेरेरा (50 लाख), जेसन होल्डर (5.75 कोटी), जो रूट (1 कोटी), अब्दुल बासित (20 लाख).
पंजाब किंग्स- शिवम सिंह (20 लाख), मोहित राठी (20 लाख), विद्वत कवेरप्पा (20 लाख), हरप्रीत सिंह भाटिया (40 लाख), सिकंदर रजा (50 लाख), सॅम करन (18.5 कोटी).
सनराइजर्स हैदराबाद- अकिल होसैन (1 कोटी), अनमोलप्रीत सिंह (20 लाख), नितीश रेड्डी (20 लाख), मयंक डागर (1.8 कोटी), उपेंद्र यादव (25 लाख), सनवीर सिंह (20 लाख), समर्थ व्यास (20 लाख), विव्रांत शर्मा (2.6 कोटी), मयंक अग्रवाल (8.25 कोटी), मयंक मार्कंडे (50 लाख), आदिल रशीद (2 कोटी), हेनरिक क्लासेन (5.25 कोटी), हॅरी ब्रूक (13.25 कोटी).
लखनौ सुपरजॉयंट्स- युधवीर सिंह चरक (20 लाख), नवीन उल हक (50 लाख), स्वपनिल सिंह (20 लाख), प्रेरक मांकड़ (20 लाख), अमित मिश्रा (50 लाख), डेनियल सॅम्स (75 लाख), रोमारियो शेफर्ड (50 लाख), यश ठाकूर (45 लाख), जयदेव उनादकट (50 लाख), निकोलस पूरन (16 कोटी).
गुजरात टायटन्स- मोहित शर्मा (50 लाख), जोसुआ लिटिल (4.4 कोटी), उर्विल पटेल (20 लाख), शिवम मावी (6 कोटी), श्रीकर भरत (1.2 कोटी), ओडिएन स्मिथ (50 लाख), केन विलियमसन (2 कोटी).