अर्जुनला शेवटची ओव्हर, नजर सचिन तेंडुलकरवर, सुनील गावसकर म्हणतात....
IPL 2023 Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले.
IPL 2023 Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलेय. अर्जुन तेंडुलकर याने आतापर्यंत आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय. सनरायजर्स हैदराबादविरोधात अर्जुन तेंडुलकर याने अखेरचं षटक टाकत मुंबईला विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात 20 धावांचा गरज असताना अर्जुनने शांत आणि संयमीपणे अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. त्याने अखेरच्या षटकात फक्त पाच धावा देत एक विकेट घेतली. अर्जुन तेंडुलकर अखेरचे षटक टाकत होता, त्यावेळी सर्वांच्या नजरा सचिनकडे होत्या. अर्जुन कसे षटक टाकतोय.. याची चर्चा होती... पण अर्जुन तेंडुलकर याने ठरल्याप्रमाणे चेंडू अचूक टप्प्यावर टाकत फलंदाजाची बॅट शांत ठेवली. अखेरच्या षटक अचूक टप्प्यावर टाकणाऱ्या अर्जुन तेंडुलकरचे सुनील गावसकर यांनी कौतुक केलेय. अर्जुन तेंडुलकरमध्ये सचिन तेंडुलकरचा स्वभाव, गुण दिसत आहेत... असे सुनील गावस्कर म्हणालेत.
काय म्हणाले गावसकर -
सुनील गावसकर यांनी अर्जुन तेंडुलकरचे तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले की, अर्जुन तेंडुलकरला त्याचे वडील सचिन तेंडुलकर यांच्या स्वभावाचा वारसा लाभला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्जुनने शेवटचे षटक टाकले आणि मुंबईला विजय मिळवून दिला. अर्जुन तेंडुलकर याने आयपीएलमधील पहिली विकेटही घेतली. अर्जुन याने अखेरच्या षटकात चेंडू अचूक टप्प्यावर टाकले त्यामुळे मुंबईचा 14 धावांनी विजय झाला. गावसकर यांनी अर्जुन आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील साम्य ओळखले.
स्टार स्पोर्ट्स क्रिकेट लाइव्ह कार्यक्रमात बोलताना गावसकर म्हणाले की, सचिन तेंडुलकर याच्या खेळाडे करिअरच्या सुरुवातीला कौतुक व्हायचे..त्याच्यामध्ये अद्भुत प्रतिभा असल्याचे अनेकजण बोलत होते. पण ते त्याचे टेम्परामेंट होते, जे जबरदस्त होते... हेच टेम्परामेंट अर्जुन तेंडुलकरला मिळाले आहे. अर्जुन तेंडुलकरने अखेरचे षटक टाकले अन् मुंबईला विजय मिळवून दिला. हे युवा खेळाडूंसाठी चांगलेय.
अर्जुन तेंडुलकरची आयपीलच्या कारकिर्दीतील पहिला विकेट
सनरायझर्स हैदराबाद संघाला शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने युवा गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीची संधी दिली. अर्जुनने कर्णधार रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवत शेवटच्या षटकात अवघ्या चार धावा दिल्या आणि एक बळी घेतला. अर्जुनच्या षटकात दोन विकेटही पडल्या. अब्दुल समद दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला. अर्जुन तेंडुलकरच्या पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारला रोहित शर्माने झेलबाद केलं आणि सनरायझर्स हैदराबादचा डाव आटोपला. अर्जुन तेंडुलकरने 2.5 षटकात 18 धावा दिल्या. अर्जुन तेंडुलकरने आयपीलएच्या दुसऱ्या सामन्यात त्याच्य आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली.
अर्जुननं वडील सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
मुंबई विरुद्ध हैदराबाग सामना संपल्यानंतर समालोचक रवी शास्त्री यांनी सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनदरम्यान अर्जुन तेंडुलकरशी संवाद साधला. यावेळी शास्त्रींनी अर्जुनला सांगितलं की, त्याने आयपीएलमध्ये विकेट्स घेण्याच्या बाबतीत त्याचे वडिल सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. सचिनने आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना एकही विकेट घेतलेली नाही. दरम्यान, अर्जुनने हैदराबादविरुद्ध आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली