(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022: अंडर-19 विश्वचषकात मैदान गाजवलं, पण आयपीएलमध्ये संघानं दाखवला नाही विश्वास; पाहा 'या' खेळाडूंची यादी
IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगामा शेवटच्या टप्प्यावर पोहचला आहे. येत्या 29 मे ला यंदाच्या हंगामातील अंतिम सामना खेळला जाणार आहे.
IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगामा शेवटच्या टप्प्यावर पोहचला आहे. येत्या 29 मे ला यंदाच्या हंगामातील अंतिम सामना खेळला जाणार आहे. यंदाच्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी त्यांना मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलं आहे. या यादीत तिळक वर्मा, उमरान मलिक, मोहसीन खान यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. परंतु, अंडर-19 विश्वचषक 2022 मध्ये ज्या खेळाडूंनी भारताला जेतेपद मिळवून दिलं. त्यातील काही खेळाडूंवर अनेक फ्रंचायझींनी बोली लावली. मात्र, त्यांना एकही सामना खेळता आला नाही, अशा खेळाडूंची यादी पाहुयात.
यश धुल
भारताला 2022 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा भारतीय संघाचा कर्णधार यश धुल यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा भाग आहे. आयपीएलच्या मेगाऑक्शनमध्ये दिल्लीच्या संघानं त्याला 50 लाखात विकत घेतलं होतं. या हंगामात यश धुलला किमान एक तरी सामना खेळण्याची संधी मिळेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण ते शक्य झालं नाही. यश संपूर्ण हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या बेंचवर बसला.
विकी ओस्तवाल
डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवालला दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएलच्या मेगाऑक्शनमध्ये त्याची मूळ किंमत 20 लाख रुपयांत विकत घेतलं. अंडर-19 विश्वचषक 2022 मध्ये विकी संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक होता. विकी ओस्तवालही आयपीएलच्या यंदाच्या संपूर्ण हंगामात बेंचवर बसला होता.
राजवर्धन हंगरगेकर
राजवर्धन हंगरगेकरला चेन्नई सुपर किंग्जनं आपल्या संघात दीड कोटी रुपयांमध्ये सामील केलं. वेगवान गोलंदाज राजवर्धन हेंगरगेकरची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. राजवर्धन हा खालच्या फळीतील एक अतिशय चांगला फलंदाज आहे. राजवर्धन आयपीएल 2022 मध्ये एकही सामना खेळू शकला नाही.
राज अंगद बावा
अंडर-19 विश्वचषक 2022 मध्ये दमदार कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू राज अंगद बावाला पंजाब किंग्जने 2 कोटी रुपयांना विकत घेतलं. यंदाच्या हंगामात त्याला केवळ दोन सामने खेळायला मिळाले. ज्यात त्यानं एकून 11 धावा केल्या. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत अष्टपैलू कामगिरी केल्याबद्दल बावा सामनावीर ठरला.
हे देखील वाचा-
- IPL 2022: रियान परागचं मिशन एबी डिव्हिलियर्स! चेन्नईविरुद्ध सामन्यात मोडला रोहित शर्मा, रवींद्र जडेजाचा 'हा' विक्रम
- IPL 2022: रियान परागचं मिशन एबी डिव्हिलियर्स! चेन्नईविरुद्ध सामन्यात मोडला रोहित शर्मा, रवींद्र जडेजाचा 'हा' विक्रम
- MI vs DC Toss Report: मुंबईत दोन तर, दिल्लीच्या संघात एक महत्वाचा बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन