IPL 2022: नेटमध्ये गोलंदाजांवर बरसला रॉबिन उथप्पा, पाहा व्हिडिओ
IPL 2022: आयपीएलमधील दिग्गज संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही.
Robin Uthappa Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad IPL 2022: आयपीएलमधील दिग्गज संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईनं आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ दोन सामन्यात चेन्नईला विजय मिळवता आला आहे. चेन्नईचा पुढील सामना हैदराबादशी होणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईचा संघ नेटमध्ये सराव करताना दिसला. त्यावेळी रॉबिन उथप्पा गोलंदाजांना मोठे फटके मारताना दिसला.
चेन्नईच्या संघानं नुकताच त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात रॉबिन उथप्पा मोठे फटके खेळताना दिसत आहे. चेन्नईच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक चाहत्यांनी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यंदाच्या हंगामात रॉबिन उथप्पानं दमदार फलंदाजी केली आहे.
व्हिडिओ-
यंदाच्या हंगामात उथप्पानं आतापर्यंत 8 सामने खेळले असून 228 धावा केल्या आहेत. ज्यात दोन अर्धशतके झळकावली आहेत. उथप्पाची आयपीएल 2022 मधील सर्वोत्तम धावसंख्या 88 धावा इतकी आहे. या हंगामात त्यानं आतापर्यंत 19 चौकार आणि 14 षटकार मारले आहेत. उथप्पानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 201 सामने खेळले आहेत. ज्यात 4950 धावा केल्या आहेत. ज्यात 27 अर्धशतकाचा समावेश आहे. आयपीएलमधील 5000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त पाच धावांची गरज आहे. हैदराबादविरुद्ध सामन्यात रॉबिन उथप्पा आयपीएलमधील 5000 धावांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा-