एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Indians: मुंबईचा आश्चर्यचकीत करणारा निर्णय! कॉमेन्ट्री करणाऱ्या खेळाडूलाचं केलं संघात सामील
Mumbai Indians: आयपीएलच्या यंदाच्या मुंबई इंडियन्सच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघानं आठ सामने गमावले आहे.
Mumbai Indians: आयपीएलच्या यंदाच्या मुंबई इंडियन्सच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघानं आठ सामने गमावले आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईचा संघ अजूनही पहिला विजय मिळवण्याच्या शोधात आहे. मुंबईतील वेगवान गोलंदाजाच्या खराब कामगिरी हताश झालेल्या मुंबईच्या संघानं एक धाडसी निर्णय घेतला आहे. कॉमेन्ट्री बॉक्समध्ये बसलेल्या खेळाडूलाच मुंबईनं संघात सामील केलं आहे.
मुंबईचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराहसाठी यंदाचा हंगाम खास ठरला नाही. तर, आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी मुंबईनं ट्रेन्ट बोल्टला रिलीज केलं होतं. त्यानंतर ऑक्शनमध्येही त्याच्यावर बोली लावण्यास अपयशी ठरले. ज्याची कमतरतात संघाला जाणवत आहे. मुंबईचा आयपीएलमधून बाहेर पडला आहे. मात्र, कमबॅक करण्यासाठी आणि विरोधी संघांना आपली ताकद दाखवण्यासाठी मुंबईचा संघ प्रयत्न करताना दिसत आहे. यातच मुंबईच्या संघानं अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णीला संघात सामील केल्याची माहिती समोर आलीय. कुलकर्णी अधिकृत प्रसारकांच्या समालोचन संघाचा भाग होता.धवल कुलकर्णीनं अधिकतर सामने राजस्थान रॉयल्ससाठी खेळले आहेत. मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्ससाठीही त्यानं गोलंदाजी केली आहे.
मुंबईच्या गोलंदाजांची खराब कामगिरी
जसप्रीत बुमराहनं यंदाच्या हंगामात मुंबईसाठी आठ सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 229 धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या आहेत. मुंबईच्या इतर गोलंदाजही विकेट्स घेण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. जयदेव उनादकटनं पाच सामन्यात 190 धावा देऊन सहा विकेट्स घेतले आहेत. डेनियल सॅम्सनंही 209 धावा देत सहा विकेट्स घेतले आहेत.
हे देखील वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement