IPL 2022, PBKS vs DC : आज पंजाबची लढत दिल्लीशी; कधी, कुठे पाहाल सामना?
IPL 2022 : प्लेऑफमधील एन्ट्रीसाठी आज पंजाब आणि दिल्ली हे संघ समोर उतरणार आहेत.

PBKS vs DC : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) हे संघ आमने-सामने उतरणार आहेत. दोघांच्या खात्यावर समान गुण असल्याने आज जिंकणारा संघ दोन अधिक गुणांसह गुणतालिकेत पुढे जाऊ शकतो. गुणतालिकेचा विचार करता दिल्लीने 12 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण खिशात घातले आहेत. ते पाचव्या स्थानावर विराजमान आहेत. दुसरीकडे पंजाब संघाने देखील 12 पैकी 6 सामने जिंकत 12 गुण मिळवले आहेत. पण त्यांचा नेट रनरेट कमी असल्याने ते सातव्या स्थानावर आहेत. दरम्यान दोन्ही संघाना पुढील फेरीत पोहचण्यासाठी आजचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात दोघांचा फॉर्म यंदा समसमान असल्यान आजचा सामना नक्कीच चुरशीचा होईल.
आज होणाऱ्या पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडूंची फौज मैदानात उतरणार यात शंका नाही. दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार असून आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कधी आहे सामना?
आज 16 मे रोजी होणारा पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
