MI vs KKR, Match Highlights : मुंबईचा सलग तिसरा पराभव, कोलकाताने पाच विकेटनं हरवलं
MI vs KKR, IPL 2022: आयपीएलमध्ये आजचा चौदावा सामना मुंबई विरुद्ध कोलकाता यांच्यात पार पडणार असून यंदाचा केकेआरचा फॉर्म पाहता मुंबईसमोर एक तगड आव्हान असेल.
LIVE
Background
MI vs KKR, Live Updates : आयपीएलमधील (IPL 2022) आजचा 14 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात पुण्याच्या एमसीए मैदानात होणार आहे. हा सामना मुंबईसाठी अधिक महत्त्वाचा असेल, कारण त्यांना यंदा एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. दोन पैकी दोन्ही सामने त्यांनी गमावले आहेत. तर दुसरीकडे केकेआरने तीन पैकी दोन सामने जिंकल्याने त्यांचं आव्हान मुंबईसाठी अवघड असेल.
दोन्ही संघाचा आजवरचा इतिहास पाहता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ तब्बल 29 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता मुंबईचं पारडं अगदी जड आहे. कारण मुंबईने 29 पैकी 22 सामने एकहाती जिंकत वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तर केकेआरला केवळ 7 सामन्यात विजय मिळवता आला आहे.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आज सामना होणाऱ्या पुण्यातील एमसीए मैदानाची खेळपट्टी पाहता दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणारे गोलंदाज स्कोर डिफेन्ड करण्यात यशस्वी राहिले आहेत. तसंच दवाचाही अधिक इफेक्ट जाणवला नसल्याने नाणेफेक जिंकणारा संघ आज प्रथम फलंदाजी करु इच्छित असेल. एक मोठी धावसंख्या निर्माण करुन प्रतिस्पर्धी संघाला कमी धावात रोखण्याचे मनसुबे नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच बांधणार असेल.
मुंबईचे संभाव्य अंतिम 11
रोहित शर्मा (कर्णधार) ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.
केकेआरचे संभाव्य अंतिम 11
अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, टीम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्थी
हे देखील वाचा-
- IPL 2022, RR vs RCB : आज रंगणार बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामना, कधी, कुठे पाहाल सामना?
- RR vs RCB : राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामन्यात होऊ शकतात मोठे बदल, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
- Womens World Cup 2022 : आयसीसीने निवडली महिला विश्वचषकातील बेस्ट 11, एकाही भारतीय खेळाडूला संधी नाही
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
MI vs KKR : कमिन्सचं वादळ, वेंकटेशचा संयम, मुंबईचा तिसरा पराभव
MI vs KKR : पॅट कमिन्सची वादळी खेळी त्याला वेंकटेशची संयमी साथ, या जोरावर कोलकाता संघाने मुंबईचा पाच विकेटनं पराभव केला आहे.
MI vs KKR : कमिन्सचं वादळी अर्धशतक
MI vs KKR : वेंकटेश अय्यरचं अर्धशतक
MI vs KKR : कोलकात्याचा अर्धा संघ तंबूत, रसेल बाद
MI vs KKR : एम. अश्विनचा कोलकात्याला दुसरा धक्का, नितेश राणा बाद
MI vs KKR : नितेश राणाला बाद करत अश्विनने कोलकाताला चौथा धक्का दिला आहे. राणा 8 धावा काढून बाद झाला. कोलकाता चार बाद 83 धावा