IPL 2022 : चेन्नईचा मुंबईवर विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
IPL 2022, MI vs CSK: एमएस धोनीने आपल्या स्टाईलनं फटकेबाजी करत रोमांचक सामना चेन्नईच्या बाजूने फिरवला. धोनीच्या फिनिशिंग टचच्या जोरावर चेन्नईने मुंबईचा तीन गड्यांनी पराभव केला.
IPL 2022, MI vs CSK: एमएस धोनीने आपल्या स्टाईलनं फटकेबाजी करत रोमांचक सामना चेन्नईच्या बाजूने फिरवला. धोनीच्या फिनिशिंग टचच्या जोरावर चेन्नईने मुंबईचा तीन गड्यांनी पराभव केला. मुंबईने दिलेले 156 धावांचे आव्हान चेन्नईने सात गड्यांच्या मोबदल्यात पार केले. धोनीच्या फटकेबाजीमुळे डॅनिअल सॅम्सची भेदक गोलंदाजी वाया गेली. अखेरच्या चेंडूवर पर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. पाहूयात या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
चेन्नईचा कर्णधार रविंद्र जाडेजानं नाणेफेक जिंकून प्रथम गोंलदाजी करण्याचा निर्णय घेतला.
मुंबईने तीन तर चेन्नईने प्लेईंग 11 मध्ये दोन बदल केले. मुंबईने डॅनिअल सॅम्सला तर चेन्नईने मिचेल सँटनरला संधी दिली. चेन्नईने मोईन अलीला वगळले.
चेन्नईच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरत मुंबईच्या फलंदाजांना ठरावीक अंतराने बाद केले. रोहित शर्मा आणि ईशान किशान यांना शून्य धावसंख्येवर बाद केले.
मुकेश चौधरीने तीन षटकात 19 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. मुकेश चौधरीने रोहिथ शर्मा, ईशान किशन आणि डेवॉल्ड ब्रेविस यांना 30 धावांच्या आत बाद केले.
तिलक वर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने निर्धारिक 20 षटकात 155 धावांपर्यंत मजल मारली.
मुंबईने दिलेल्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवातही खराब झाली. ऋतुराज गायकवाड एकही धाव न काढता माघारी गेला.
डॅनिअल सॅम्सने भेदक मारा करत चार विकेट घेतल्या. सॅम्सच्या भेदक माऱ्यापुढे चेन्नईचे फलंदाज चाचपडताना दिसले. डॅनिअल सॅम्सने ऋतुराज गायकवाड, मिचेल सँटनेर, अंबाती रायडू आणि शिवम दुबेला बाद केले.
अखेरच्या तीन षटकात फिरला सामना
चेन्नईला विजयासाठी 18 चेंडू 42 धावा .... करायच्या होत्या. जयदेव उनाडकद गोलंदाजीसाठी आला... जयदेव घेऊन आलेल्या 17 व्या षटकात चेन्नईने 14 धावा वसूल केल्या. बुमराहच्या षटकात 11 धावा... अखेरच्या षटकात 17 धावांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर प्रिटोरिसला बाद करत सामना रोमांचक केला. पण धोनीने आपल्या स्टाईलने सामना फिरवला.
प्रिटोरिस आणि धोनीने सामना फिरवला... दोघांनी मोक्याच्या क्षणी दबावात न जाता 21 चेंडूत 33 धावांची भागिदारी केली. प्रिटोरिसने 14 चेंडूत 22 तर धोनीने 13 चेंडूत 28 धावांची खेळी केली.
धोनीचा फिनिशिंग टच -
जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीने पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवला. 18 चेंडूत 42 धावांची गरज असताना धोनीने आपल्या स्टाईलने सामना फिरवला. बुमराहच्या गोलंदाजीवर धोनीने कोणतीही रिस्क घेतली नाही. उनाडकदच्या गोलंदाजीवर धोनीने धावांचा पाऊस पाडला. धोनीने 13 चेंडूत 28 धावांची खेळी करत सामना चेन्नईच्या बाजूने फिरवला.