एक्स्प्लोर

CSK vs MI, Match Highlights : मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर चेन्नईची फलंदाजी ढासळली, 15.5 षटकात संघ सर्वबाद, मुंबईसमोर 98 धावांचे आव्हान

IPL 2022 : चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्या सुरु असलेल्या सामन्यात मुंबईने दमदार गोलंदाजी करत चेन्नईला अवघ्या 97 धावांत सर्वबाद केलं आहे.

CSK vs MI : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजच्या 59 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने एका दमदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत चेन्नई सुपरकिंग्सची दाणादाण उडवली आहे. चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) सामन्यात चेन्नईचा संघ 15.5 षटकात अवघ्या 98 धावा करुन सर्वबाद झाला आहे. त्यामुळे मुंबईसमोर आता 98 धावांचे माफक आव्हान आहे. मुंबईच्या सर्वच गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली असून डॅनियल सॅम्सने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत.

सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत मुंबईने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना सायंकाळी असल्याने दुसऱ्या डावात दवाची अडचण येण्याची शक्यता असल्याने मुंबईने हा निर्णय़ घेतला असावा. दरम्यान कर्णधार रोहितचा हा निर्णय संघाने अगदी योग्य असल्याचं दाखवून दिलं, त्यांनी चेन्नईच्या फलंदाजांना अक्षरश: सळो की पळो केलं. त्यामुळे चेन्नईचा संघ केवळ 97 धावा करु शकला आहे. त्यामुळे मुंबईसमोर आता 98 धावांचे लक्ष्य आहे. मुंबईकडून सर्व सर्वच गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. पण डॅनियल सॅम्सने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 4 षटकात 16 धावा देत 3 विकेट्स नावे केल्या आहेत. तर रिले मेरिडेथ आणि कुमार कार्तिकेय यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले आहेत. रमनदीप यानेही एक षटक टाकत 5 धावा देत एकच विकेट घेतली आहे. 

धोनीने दिली अखेरपर्यंत लढत 

चेन्नईचे सर्वच खेळाडू एकामागे एक तंबूत परतत होते. कॉन्वे, मोईन अली आणि महेश तीक्षणा तर शून्यावर बाद झाले. इतरही खेळाडू खास कामगिरी करु शकले नाहीत. पण कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मात्र एकहाती अखेरपर्यंत झुंज देत संघाला किमान 98 धावांपर्यंत पोहोचवलं. धोनीने 33 चेंडूत नाबाद 36 धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. धोनीने 4 चौकार आणि 2 षटकार यावेळी ठोकले. 

 हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget