LSG vs GT, Match Live Updates : गुजरातचा लखनौवर 62 धावांनी विजय
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स हे संघ पुण्याच्या एमसीए मैदानात आमने-सामने उतरणार आहेत.
LIVE
Background
LSG vs GT, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 57 वा सामना लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात जायंट्स (LSG vs GT) या दोन संघात पार पडत आहे. गुणतालिकेत दोन्ही संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असल्याने ते जवळपास पुढील फेरीत पोहोचले आहेत. पण तरी दोघांचा दमदार फॉर्म पाहता आजचा सामना क्रिकेट प्रेमीसाठी एक पर्वणी असणार आहे.
गुणतालिकेचा विचार करता दोन्ही संघ पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लखनौचा रनरेट अधिक असल्याने ते पहिल्या आणि गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ जवळपास पुढील फेरीत पोहोचलेच आहेत, पण अधिकृत हे जाहीर होण्याआधी आज दोघांचा एकमेंकाशी सामना असल्याने आज त्यांच्यातील लढत चुरशीची होणार यात शंका नाही. आज होणाऱ्या लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्सया सामन्यात दोन्ही संघाकडून एक दमदार खेळी पाहायला मिळू शकते. पुण्यातील एमसीए मैदानात इतर मैदानांच्या तुलनेत कमी सामने झाल्याने तेथील खेळपट्टी अधिक चांगली आहे. त्यात सामना सायंकाळी असला तरी पुण्यातील तापमान पाहता दवाची अधिक अडचण दोन्ही इनिंगमध्ये येत नाही. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी देखील करु शकतो. पण यंदाच्या हंगामात बहुतांश संघानी दुसऱ्यांदा फलंदाजी करताना विजय मिळवला आहे.
लखनौ संभाव्य अंतिम 11 -
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), दीपक हुडा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, मनिष पांडे, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.
गुजरात संभाव्य अंतिम 11 -
शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, यश दयाल, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.
हे देखील वाचा-
गुजरातचा लखनौवर 62 धावांनी विजय
गुजरातच्या भेदक माऱ्यापुढे लखनौचा डाव 82 धावांत संपुष्टात आला... गुजरातने लखनौचा 62 धावांनी पराभव केला.
लखनौला मोठा धक्का, दीपक हुडा बाद
राशिद खानने दीपक हुडाला बाद करत लखनौला मोठा धक्का दिला.. दीपक 27 धावा काढून बाद झाला.
लखनौला आठवा धक्का, मोहसीन बाद
मोहसीनच्या रुपाने लखनौला आठवा धक्का बसला आहे. मोहसीन एक धाव काढून बाद झाला.
लखनौला सलग दोन धक्के, स्टॉयनिस-होल्डर बाद
लखनौचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत आहेत.. आता स्टॉयनिस धावबाद झाल्यानंतर राशिदने जेसन होल्डरचाही अडथळा दूर केलाय... लखनौची अवस्था खराब झाली.. लखनौ सात बाद 67 धावा
लखनौला पाचवा धक्का, आयुष बडोनी बाद
आयुष बडोनीच्या रुपाने लखनौला पाचवा धक्का बसलाय. साई किशोरने बडोनीला 11 धावांवर बाद केलेय.