MI vs LSG, 1 Innings Highlight: कर्णधार केएल राहुलचं दमदार अर्धशतक, लखनौचं मुंबईसमोर 200 धावाचं आव्हान
IPL : आतापर्यंतच्या आयपीएल 2022 मध्ये एकही सामना न जिंकलेल्या मुंबईला आज पहिला विजय मिळवण्यासाठी 200 धावा करायला लागणार आहेत.
MI vs LSG : आयपीएलमधील 2022 (IPL 2022) मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (MI vs LSG) या 26 व्या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलचा दमदार फॉर्म पाहायला मिळाला आहे. राहुलने दमदार असं शतक ठोकलं आहे. त्याने 60 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केल्यामुळे संघाने 199 धावांपर्यंत मजल मारली आहे. ज्यामुळे आता हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी मुंबईला 200 धावांची गरज आहे. मुंबई संघाकडून आज खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लखनौचे सलामीवीर मैदानात आले. डि कॉक आणि राहुलने धडाकेबाद सुरुवात केली खरी पण डि कॉक 24 धावा करुन तंबूत परतला. मग मनिष आणि राहुलने एख दमदार अशी भागिदारी रचली पण पांडे 38 धावा करुन तंबूत परतल्यानंतरही राहुलने फटकेबाजी कायम ठेवली. स्टॉयनिसने 10 तर दीपकने 15 धावांची साथ राहुलला दिली. ज्यामुळे लखनौने 199 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. राहुलने 60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 103 धावा केल्या.
मुंबईची खराब गोलंदाजी
मागील हंगामापर्यंत सर्वात दमदार असं बोलिंग युनिट म्हणून ओळखल्या जाणाऱ्य मुंबईकडे यंदा बुमराह सोडता सर्व नवे गोलंदाज आहेत. त्यामुळे मुंबईला गोलंदाजीत कमाल करता येत नाही असल्याचं दिसून येत आहे. त्यात आज मुंबईने खराब गोलंदाजीसह खराब क्षेत्ररक्षणही केलं. अनेकदा खराब क्षेत्ररक्षणामुळे चौकार गमावल्याचं दिसून आलं. मुंबईने मोठ्या विश्वासाने संघात घेतलेल्या इंग्लंडच्या टायमल मिल्सच्या गोलंदाजीवर आज तुफान फटकेबाजी झाली. त्याला तीन षटकात 54 धावा आल्या. दुसरीकडे फेबियन एलनच्या चार षटकात देखील 46 धावा आल्या. केवळ बुमरहाने 24 चेंडूत 24 धावा देत दिल्या. विकेट्सचा विचार करता उनडकटने दोन, मुरगन आणि फेबियन एलनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
हे देखील वाचा-