IPL 2022: आयपीएल चाहत्यांसाठी खुशखबरी! जिओकडून सर्वात स्वस्त क्रिकेट प्लॅन लॉन्च; Disney+Hotstar चं सबस्क्रिप्शन मिळणार मोफत
Reliance Jio Offer: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई आणि कोलकात्याचा संघ एकेमकांशी भिडणार आहे.
Reliance Jio Offer: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई आणि कोलकात्याचा संघ एकेमकांशी भिडणार आहे. या सामन्यापूर्वी रिलायन्स जिओनं आयपीएल चाहत्यांना मोठी भेट दिलीय. दरम्यान, जिओनं क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेट अॅड ऑन प्रीपेड प्लॅन लॉन्च केलाय. या प्लॅन अतंर्गत क्रिकेट चाहते आयपीएलचा आनंद लुटू शकतात. हा जिओचा सर्वात स्वस्त डिज्नी+ हॉटस्टार प्लॅन आहे. या प्लॅनबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
भारताची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओनं 279 रुपयांचा क्रिकेट अॅड ऑन प्रीपेड प्लॅन लॉन्च केलाय. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डिज्नी + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन मिळणार आहे. याप्लॅनमध्ये डिज्नी + हॉटस्टार मोबाइलचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन आणि एकूण 15GB हाय-स्पीड इंटरनेट दिलं जाईल. या प्लॅनमुळं जिओच्या ग्राहकांना क्रिकेटचे लाईव्ह सामने पाहता येणार आहेत. आयपीएल पाहण्यासाठी त्यांना वेगळा रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळणार नाही. महत्वाचं म्हणजे, जिओचा 279 रुपयांचा प्लॅन निवडक ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. हा प्लॅन तुमच्यासाठी उपलब्ध आहे की नाही? हे जाणून घ्यायचं असल्यास तुम्हाला माय जिओच्या मोबाइल अॅपवर भेट द्यावी लागणार आहे.
जिओचा सर्वात स्वस्त डिज्नी + हॉटस्टार प्लॅन
जिओच्या या 499 रुपयांच्या क्रिकेट प्लानची वैधता 28 दिवसांची असेल. याशिवाय या प्लानमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये डिज्नी + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध असतील. जिओचा 601 रुपयांचा प्लॅन हा दररोज ३ जीबी डेटा देणारा प्लान आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता असेल. या प्लॅनमध्ये डिज्नी + हॉटस्टारचे मोबाईल सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध असेल. ज्यावर तुम्ही आयपीएलचे सामने पाहू शकतात. या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध असतील.
हे देखील वाचा-
- IPL 2022 : आजपासून आयपीएल 2022 ची सुरुवात, 10 संघांत लढत, पहिल्या सामन्यात कोलकाता आणि चेन्नई आमनेसामने
- IPL 2022, CSK vs KKR : सर रवींद्र जाडेजापुढे श्रेयस अय्यरचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
- IPL 2022 : जोश तोच... अंदाज नवा! आयपीएलच्या 15 व्या मोसमात नवं काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha