IPL 2022: दिल्लीच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल, 'या' चार संघाची टॉप 4 मध्ये एन्ट्री
IPL 2022: मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 50 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादचा संघ आमने सामने आले होते.
IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 50 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादचा संघ (Delhi Capitals Vs Sunrisers Hyderabad) आमने सामने आले होते. हा सामना दिल्लीच्या संघानं 21 धावांनी जिंकला. दरम्यान, दिल्लीच्या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल पाहायला मिळत आहे. हैदराबादला पराभूत केल्यानंतर दिल्लीच्या संघ पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. तर, हैदराबादचा संघाची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.
आयपीएल 2022 मध्ये गुजरातची दमदार कामगिरी
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात हैदराबादच्या संघान दहा पैकी आठ सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 16 गुणांसह गुजरातचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.गुजरातचा संघ प्लेऑफसाठी जवळपास पात्र ठरला आहे. गुजरातसोबतच लखनौ, राजस्थान आणि बंगळुरूच्या संघांचा टॉप-4 मध्ये समावेश आहे. लखनौचे 7 सामने जिंकून 14 गुण झाले आहेत. तर राजस्थान आणि बंगळुरूनं 6-6 सामने जिंकले असून त्यांचे 12 गुण आहेत.
आयपीएल 2022 ची गुणतालिका-
क्रमांक | संघ | सामने | विजय | पराभव | नेट रन रेट | गुण |
1 | गुजरात टायटन्स | 10 | 8 | 2 | 0.158 | 16 |
2 | लखनौ सुपर किंग्ज | 10 | 7 | 3 | 0.397 | 14 |
3 | राजस्थान रॉयल्स | 10 | 6 | 4 | 0.340 | 12 |
4 | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | 11 | 6 | 5 | -0.444 | 12 |
5 | दिल्ली कॅपिटल्स | 10 | 5 | 5 | 0.641 | 10 |
6 | सनरायजर्स हैदराबाद | 10 | 5 | 5 | 0.325 | 10 |
7 | पंजाब किंग्ज | 10 | 5 | 5 | -0.229 | 10 |
8 | कोलकाता नाईट रायडर्स | 10 | 4 | 6 | 0.060 | 8 |
9 | चेन्नई सुपर किंग्ज | 10 | 3 | 7 | -0.431 | 6 |
10 | मुंबई इंडियन्स | 9 | 1 | 8 | -0.836 | 2 |
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जची निराशाजनक कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणारा मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत बाहेर पडला आहे. मुंबईनं 9 सामने खेळले असून 8 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. तर, चेन्नईसाठीही यंदाचा हंगाम काही खास ठरला नाही. चेन्नईनं दहा पैकी सात सामने गमावले आहेत. तर, केवळ तीन सामने जिंकले आहेत. चेन्नईच्या संघाला आणखी चार सामने खेळायचे आहेत. पुढील चारही सामन्यात विजय मिळवल्यानंतरही चेन्नईचं प्लेऑफमध्ये स्थान मिळवता येणार नाही. इतर संघाच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून राहवं लागणार आहे.
हे देखील वाचा-
- On This Day in 2013: आजच्या दिवशी 'डेव्हिड मिलर' आरसीबीसाठी ठरला होता 'किलर', सुपरफास्ट शतकानं वेधलं क्रिडाविश्वाचं लक्ष
- SRH vs DC 2022: शतकासाठी फक्त 8 धावांची गरज, पण तरीही वार्नरनं... पॉवेलनं सांगितलं अखरेच्या षटकातील दोघांमधील संभाषण
- IPL 2022: भुवनेश्वर कुमारनं मोडला आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम, इरफान पठाणच्या विक्रमाशी केली बरोबरी