IPL 2022: यंदाच्या हंगामात गोलंदाजांची हवा, पाहा आश्चर्यचकीत करणारी आकडेवारी
आयपीएलमध्ये आतापर्यंत 42 सामने खेळले गेले आहेत. यातील 18 सामने गोलंदाजांनी किंवा ऑलराऊंडर्सनं संघाला जिंकून दिले आहेत.
IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगामात रोमांचक वळणावर आलाय. यंदाच्या हंगामाचा पहिला टप्पा पार पडला असून आता दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू झाले आहेत. आयपीएल 2022 मध्ये गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. संघाच्या विजयात गोलंदाजांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. आयपीएलमधील गोलंदाजाच्या कामगिरीवर एक नजर टाकुयात.
आयपीएलमध्ये आतापर्यंत 42 सामने खेळले गेले आहेत. यातील 18 सामने गोलंदाजांनी किंवा ऑलराऊंडर्सनं संघाला जिंकून दिले आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की गोलंदाजाला 42 पैकी 18 वेळा सामनावीर म्हणून निवडण्यात आलं आहे. गेल्या 5 हंगामातील ही पहिली वेळ आहे, ज्यात गोलंदाजाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आहे. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवनं यंदाच्या हंगामात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. त्याला चार वेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आलंय.
यंदाच्या हंगामात 500 हून अधिक विकेट्स
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एकूण 519 विकेट पडल्या आहेत, आयपीएलच्या मागच्या हंगामात 493 विकेट्स पडले होते. पहिल्या 42 सामन्यांमध्ये 500 हून अधिक विकेट पडण्याची गेल्या 5 हंगामातील ही दुसरी वेळ आहे.
गोलंदाजांनी सोडली छाप
आयपीएल 2022 मध्ये 17 गोलंदाजांनी चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतले आहेत. आयपीएलच्या गेल्या पाच हंगामात पहिल्यांदा असं घडलं. आयपीएलच्या मागच्या हंगामात 13 वेळा, 2019 मध्ये 10 वेळा, 2018 मध्ये 9 वेळा चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स पडले होते. यंदाच्या हंगामात युजवेंद्र चहल आणि उमरान मलिकनं पाच विकेट्स घेण्याचा विक्रम रचलाय.
हे देखील वाचा-