(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DC vs SRH, Toss Update : हैदराबादने नाणेफेक जिंकत घेतली गोलंदाजी, दोन्ही संघात मोठे बदल; पाहा आजची अंतिम 11
प्लेऑफच्या शर्यतीत जवळपास असणाऱ्या दिल्ली आणि हैदराबाद संघात आज सामना पार पडत आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात नुकतीच नाणेफेक झाली आहे.
DC vs SRH : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 50 वा सामना आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनराजयजर्स हैदराबाद (DC vs SRH) हे दोन्ही संघ मैदानात उतरले असून हैदराबादने नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकत हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दिल्लीचे खेळाडू आधी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. दोन्ही संघानी काही महत्त्वाचे बदल करत आजचा सामना खेळण्याचा निर्णय़ घेतला आहे.
दोन्ही संघानी काही बदल केले आहेत. यात दिल्लीने चार तर हैदराबादने तीन बदल करत संघ उतरवला आहे. यावेळी दिल्लीमध्ये पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, मुस्तफिजूर रेहमान आणि चेतन साकरिया यांना विश्रांती दिली असून एनरिक नॉर्खिया, मनदीप सिंह, रिपल पटेल आणि खलील अहमद यांना संधी दिली आहे. दुसरीकडे हैदराबादमध्ये कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल आणि सिन एबॉट यांना संधी देण्यात आली आहे. टी. नटराजन आणि वॉशिग्टन सुंदर दुखापतग्रस्त असून मार्को जॅन्सन याला विश्रांती देण्यात आली आहे.
मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडणाऱ्या आजच्या सामन्यात आमने-सामने असणाऱ्या दिल्ली आणि हैदराबाद (DC vs SRH) संघाने आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये जवळपास समसमान कामगिरी केली आहे. हैदराबादने आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकत पाचवं स्थान मिळवलं आहे. तर दिल्लीचा संघ मात्र 9 पैकी 4 सामनेच जिंकला असल्याने सातव्या स्थानी आहे. त्यामुळे दोघांचीही पुढील फेरीत पोहचण्याची शक्यता समसमान असल्याने आजचा सामना जिंकणं दोघांसाठी अत्यंत महत्वाचं असेल. आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या या सामन्यात दोन्ही संघांनी बरेच बदल केल्याने नेमके कोणते खेळाडू खेळणार आहेत यावर एक नजर फिरवूया...
दिल्ली अंतिम 11
ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, मनदीप सिंह, मिचेल मार्श, ललित यादव, रोवमन पोवेल, रिपल पटेल, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्खिया
हैदराबाद अंतिम 11
अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंह, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, सिन एबॉट, उम्रान मलिक.
हे देखील वाचा-