IPL Hat Tricks : आयपीएलची पहिली हॅट्ट्रिक कुणी घेतली? आतापर्यंत 21 वेळा झालाय करिश्मा
राजस्थानच्या यजुवेंद्र चाहलने कोलकात्याविरोधात हॅट्ट्रिक केली. यंदाच्या हंगामातील ही पहिलीच हॅट्ट्रिक होय. पण आयपीएलमध्ये पहिली हॅट्ट्रिक कुणी घेतली होती? आयपीएलमध्ये आतापर्यंत किती हॅट्ट्रिक झाल्या?
IPL Hat Tricks : आयपीएलचा 15 वा हंगामाला सुरुवात होऊन महिना झाला आहे. 2008 मध्ये सुरु झालेल्या आयपीएलचा हा 15 वा हंगाम आहे. आयपीएल स्पर्धा जशी धावांची लूट कऱणारी स्पर्धा म्हणून ओळखली जाते तशी कमीत कमी धावा देऊन जास्तीत जास्त विकेट घेणाऱ्या गोलंदाजांची स्पर्धाही म्हणूनही ओळखली जाते. आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक गोलंदाजांनी हॅट्ट्रिक केली आहे. राजस्थानच्या यजुवेंद्र चाहलने कोलकात्याविरोधात हॅट्ट्रिक केली. यंदाच्या हंगामातील ही पहिलीच हॅट्ट्रिक होय... पण आयपीएलमध्ये पहिली हॅट्ट्रिक कुणी घेतली होती? आयपीएलमध्ये आतापर्यंत किती हॅट्ट्रिक झाल्या?
आयपीएलची पहिली हॅट्ट्रिक एल बालाजीने घेतली होती. आतापर्यंत आयपीएलमध्ये 21 हॅट्ट्रिक झाल्या आहेत. यात रोहित शर्मा, युवराज सिंह आणि अमित मिश्रा यांचाही समावेश आहे... पाहूयात आतापर्यंत घेतलेल्या हॅट्ट्रिकविषयी..
2008 : IPL च्या पहिल्याच हंगामात हॅट्ट्रिक झाली होती. चेन्नईकडून खेळणाऱ्या लक्ष्मीपती बालाजीने आयपीएलची पहिली हॅट्ट्रिक घेतली होती. दिल्लीविरोधात बालाजीने हॅट्ट्रिक केली होती. याच हंगामात दिल्लीच्या अमित मिश्राने आणि चेन्नईच्या मखया नतिनी यांनाही हॅट्ट्रिक घेतली होती.
2009 : पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या युवराजने दोन हॅट्ट्रिक घेतल्या होत्या. तर डेक्कन चार्जसकडून खेळणाऱ्या रोहित शर्माने हॅट्ट्रिक केली होती.
2010 : आरसीबीचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमारने राजस्थान रॉयल्सविरोधात हॅट्ट्रिक घेतली होती.
2011 : डेक्कन चार्जर्सचा फिरकीपटू अमित मिश्राने हॅट्ट्रिक घेतली होती. पंजाबविरोधात त्याने कारनामा केला होता.
2012 : श्रीलंकाकेचा अजित चंडिलाने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना हॅट्ट्रिक केली होती.
2013 : कोलकात्याचा सुनिल नारायण, सनराइजर्स हैदराबादचा अमित मिश्रा यांनी या हंगामात हॅट्ट्रिक केली होती.
2014 : राजस्थानकडून खेळणारे प्रवीण तांबे आणि शेन वॉटसन या दोघांनी हॅट्ट्रिक केली होती.
2016 : अक्षर पटेलने पंजाब किंग्सकडून खेळताना गुजरात लायन्सविरोधात हॅट्ट्रिक केली होती.
2017 : या हंगामात तीन गोलंदाजांनी हॅट्ट्रिक घेतली होती. RCB कडून सॅमुअल बद्री, गुजरात लायन्सकडून एंड्र्यू टाय आणि रायसिंग पुणे सुपर जायंट्सकडून जयदेव उनादकट यांनी हॅट्ट्रिक घेतली होती.
2019 : पंजाब किंग्सच्या सॅम करन आणि राजस्थान रॉयल्सच्या श्रेयस गोपाल यांनी हॅट्ट्रिक घेतली होती.
2021: RCB चा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने मुंबईविरोधात हॅट्ट्रिक घेतली होती.
2022 : युजवेंद्र चहलने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना कोलकाता विरोधात हॅट्ट्रिक घेतली.