IPL 2022 : हार्दिक पांड्याचा धाडसी निर्णय, यंदाच्या आयपीएलमध्ये असा निर्णय घेणारा पहिलाच कर्णधार
IPL 2022 : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या 15 व्या हंगमात आतापर्यंत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IPL 2022 : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या 15 व्या हंगमात आतापर्यंत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण तब्बल 34 व्या सामन्यानंतर हार्दिक पांड्याने नाणेफेकीनंतर मोठा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणारा यंदाच्या हंगमातील गुजरात पहिलाच संघ ठरला आहे. याआधी कोणत्याही संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतेला नाही.
आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यात प्रत्येक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कारण, सामन्यात दव महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करतााना फायदा होतोय. पहिल्या आठवड्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची विजयाची टक्केवारी 87.5 टक्के राहिली आहे. आतापर्यंत नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने मोठी धावसंख्या उभारुन प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणला आहे. आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची विजयाची टक्केवारी वाढल्याचं आकडेवारीवरुन दिसते. दुसऱ्या आठवड्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या विजयाची टक्केवारी 100 टक्के राहिली आहे, त्यामुळे नाणेफेक जिंकूनही पराभवाचा सामना करावा लागला.
मागील सहा वर्षात झालेल्या 364 सामन्याचा विचार करता आतापर्यंत दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची विजयाची टक्केवारी 40 आहे. मागील सहा वर्षात झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ 150 वेळा जिंकला आहे तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 214 वेळा बाजी मारली आहे. आज हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याने ट्रेंड बदलण्याचा प्रयत्न करत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला किती यश मिळेल, हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल...
गुजरात-कोलकातामध्ये महत्वाचे बदल -
गुजरात आणि कोलकाता दोन्ही संघाने बदल केले आहेत. अंतिम 11 चा विचार करता कोलकाता संघाने टीममध्ये तीन बदल केले आहेत. यावेळी विकेटकीपर म्हणून शेल्डॉन जॅक्सनच्या जागी सॅम बिलिंग्जला संधी दिली आहे. तर पॅट कमिन्सच्या जागी टीम साऊदी आणि आरॉन फिंचच्या जागी रिंकू सिंगला संधी दिली आहे. तर गुजरातचा कर्णधार हार्दिक फिट असून आज संघात परतल्यामुळे विजय शंकराला विश्रांती देण्यात आली आहे.