(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR vs GT, Match Highlights : हार्दिकची एकाकी झुंज, गुजरातचं कोलकात्याला 157 धावांचे आव्हान
IPL : प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाने कर्णधार हार्दिकच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यासमोर 157 धावांचे आव्हान ठेवले आहे.
KKR vs GT : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 35 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स (KKR vs GT)या दोन्ही संघात पार पडत आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाने कर्णधार हार्दिकच्या खेळीच्या जोरावर कोलकात्यासमोर 157 धावांचे आव्हान ठेवले आहे. केकेआरने अत्यंत कसून गोलंदाजी केली असून रसेलने अखेरच्या षटकात तब्बल 4 विकेट्स घेतल्या आहेत.
सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. शक्यतो नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी घेत असल्याचं दिसून आलं आहे. पण गुजरातने काहीसा वेगळा निर्णय़ घेतला. पण गुजरातचा हा निर्णय खास ठरु शकला नसून गुजरातचे बहुतेक फलंदाज खास कामगिरी करण्यात फेल झाले. केवळ कर्णधार हार्दिकने अर्धशतक ठोकलं. याशिवाय साहाने 25 आणि मिलरने 27 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला मदत केली.
हार्दिकची एकाकी झुंज
सामन्यात गुजरातचे फलंदाज खास कामगिरी करु शकले नाही. सलामीवीर शुभमन 7 धावांवर स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर हार्दिकने कोलकात्याविरुद्ध आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे त्याने थेट दुसऱ्या स्थानावर फलंदाजीचा निर्णय़ घेतला. त्यानंतर साहा आणि पंड्या यांनी काहीसा डाव सावरला पण 25 धावा करुन साहा बाद झाला. त्यानंतर मधील फलंदाजही खास कामगिरी करु शकले नाही. मिलरने 27 धावांची खेळी केल्यामुळे काहीसा डाव सावरला. पण सर्व संघाचा विचार करता कर्णधार पांड्याने सर्वात चांगली कामगिरी केली. त्याने 49 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार ठोकत 67 धावा केल्या.
केकेआरची कसून गोलंदाजी
केकेआरने पहिल्या षटकापासून उत्तम गोलंदाजी कायम ठेवली. यावेळी क्षेत्ररक्षणही त्यांनी चांगलं ठेवलं. आज सामन्यात संधी मिळालेल्या रिंकू सिंगने तब्बल चार महत्त्वाचे झेल यावेळी घेतले. हार्दिकचा महत्त्वाचा झेलही त्यानेच घेतला. तर अखेरच्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या आंद्रे रसेलने तब्बल 4 विकेट्स घेतले. याशिवाय टीम साऊदीने 3 तर उमेश यादव आणि शिवम मावीने प्रत्येकी एक विकेट घेतली.
हे देखील वाचा-
- DC vs RR, Top 10 Key Points : राजस्थानचा दिल्लीवर विजय, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर
- IPL Full Match Highlights: राजस्थानचा धावांचा डोंगर सर करण्यात दिल्ली अपयशी, 15 धावांनी पराभव
- Asian Wrestling Championships : आशियाई कुस्ती स्पर्धेत अंशू मलिक आणि राधिकाला रौप्यपदक, मनीषाला कांस्य