(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022, DC vs RR : आज दिल्ली-राजस्थान आमने-सामने; कधी, कुठे पाहाल सामना?
IPL 2022 : आज दिल्ली आणि राजस्थान या दोन संघात वानखेडे मैदानात सामना होणार आहे.
DC vs RR : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात सामना होणार आहे. राजस्थान संघाने यंदा उत्तम कामगिरी करत गुणतालिकेत तिसरं स्थान मिळवलं आहे. तर दिल्लीने देखील मागील सामन्यांत उत्तम कामगिरी केली होती. राजस्थानने यंदा 6 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह तिसरं स्थान मिळवलं आहे. तर बंगळुरुने देखील 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यांच्या खात्यावर 6 गुण आहेत.
आज होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) या सामन्यात दोन्ही संघाकडून एक चांगली आणि चुरशीची खेळी पाहायला मिळू शकते. कारण राजस्थान आणि दिल्ली संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये 24 सामने खेळले आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 12 - 12 सामने जिंकले आहेत. यंदाच्या हंगामात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. मागील रेकॉर्ड पाहाता दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना होऊ शकतो. जो संघ दमदार प्रदर्शन करेल, तो बाजी मारेल आणि हेड टू हेड रेकॉर्डमध्यही पुढे जाईल.
कधी आहे सामना?
आज 22 एप्रिल रोजी होणारा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
हे देखील वाचा-