IPL 2022, DC vs PBKS : आज दिल्ली विरुद्ध पंजाबमध्ये लढत; कधी, कुठे पाहाल सामना?
IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्स संघात कोरोनाच्या केसेस सापडल्याने सामन्याचे ठिकाण पुण्यावरुन बदलून मुंबई करण्यात आले आहे.
DC vs PBKS : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स (Delhi Capitals vs Punjab Kings) या दोन संघात सामना होणार आहे. गुणतालिकेचा विचार करता हे दोन्ही संघ अनुक्रमे आठव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. दिल्लीने 5 पैकी 2 सामने जिंकले असून पंजाबने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. दिल्ली एका विजयाने पंजाबच्या मागे असली तरी रनरेटच्या बाबतीत दिल्लीचा संघ पुढे आहे.
दोन्ही संघाचा खेळ यंदाच्या हंगामात सुमार दिसून येत आहे. पंजाबने आतापर्यंत अधिक विजय मिळवले आहेत. पण संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यात मागील सामन्यात कर्णधार मयांक अगरवाल दुखापतीमुळे खेळला नव्हता. त्यामुळे आजतरी तो खेळणार का? हा मोठा प्रश्न पंजाब फॅन्सना आहे. आज होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स (DC vs PBKS) या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडूंची फौज मैदानात उतरणार यात शंका नाही. दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार असून आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कधी आहे सामना?
आज 20 एप्रिल रोजी होणारा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.
हे देखील वाचा-
- Yuzvendra Chahal : चहलच्या ज्या फोटोवर तयार झाले होते मीम्स, त्याच स्टाईलमध्ये केलं हॅट्रिकचं सेलिब्रेशन, पाहा Video
- RR Vs KKR: फिंच- अय्यरची अर्धशतकी खेळी व्यर्थ; कोलकात्याचा 7 धावांनी पराभव, चहल ठरला राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार
- Mitchell Marsh Covid Positive: दिल्लीचा ऑलराऊंडर मिशेल मार्श कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
- IPL 2022: देवदत्त पडिक्कल सुसाट! कोलकात्याविरुद्ध रचला विक्रम, रोहित शर्मालाही टाकलं मागं