(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SRH in IPL 2022: लिलावापूर्वीच हैदराबादच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, डेल स्टेन पुन्हा संघात परतणार, संघाच्या विजयात उचलणार महत्वाचा वाटा
SRH in IPL 2022: दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनची गणना जगातील महान गोलंदाजांमध्ये केली जाते.
SRH in IPL 2022: दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनची गणना जगातील महान गोलंदाजांमध्ये केली जाते. त्यानं आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक पराक्रम केलेत. यातच डेल स्टेन पुन्हा एकदा आयपीएलमध्ये पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आलीय. आयपीएलमध्ये डेल स्टेन अनेक संघाकडून खेळलाय. याचदरम्यान, हैदराबादच्या संघ डेल स्टेनवर मोठी जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे. एका वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, डेल स्टेनची सनरायजर्सच्या गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. फ्रँचायझी पुढील आठवड्यापर्यंत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
क्रिकेट वेबसाइट क्रिकबझनं दिलेल्या माहितीनुसार, डेल स्टेन आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक बनणार आहे. अहवालानुसार, फ्रँचायझीच्या एका अधिकाऱ्यानं डेल स्टेनची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. स्टेनने या वर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानं आयपीएलमध्ये एकूण 95 सामने खेळले. यादरम्यान त्यानं डेक्कन चार्जर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात लायन्सचं प्रतिनिधित्व केलंय. क्रिकबझनं आपल्या वृत्तात लिहिले आहे की, स्टेनशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्याने या संदेशाला प्रतिसाद दिला नाही. मात्र, यासंदर्भात आयपीएल अधिकाऱ्यानं स्टेन या पदाची सूत्रे हाती घेणार असल्याची पुष्टी केलीय.
डेल स्टेननं आतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 93 कसोटी, 125 एकदिवसीय आणि 47 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. त्यानं कसोटीत 439 आणि एकदिवसीय सामन्यात 196 विकेट्स घेतले आहेत. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 64 बळी घेतले आहेत. स्टेननं मार्च 2019 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. स्टेननं डिसेंबर 2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- BWF World Championships: पी.व्ही सिंधुची जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक, थायलँडच्या पोर्नपावी चोचुवँगचा केला पराभव
- Ashes Test Series 2021: चार फूट दूर जाणारा चेंडू एका हातानं पकडला, अॅशेस मालिकेत जॉस बटलरनं टीपला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ
- Ashes 2021 : दुसऱ्या सामन्यात नसल्याने पॅट कमिन्स निराश, पण नवख्या मायकेल नेसरसाठी आनंदी