एक्स्प्लोर

IPL 2021 : बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या अडचणींमध्ये वाढ; कारवाई होणार?

विराटसेनेच्या बंगळूरुने हैदराबादवर सहा धावांनी मात केली. पण कालच्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. अशातच विराट बाद झाल्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

IPL 2021 : इंडियन प्रिमियर लीगच्या 14व्या सीझनमध्ये बंगलोरने हैदराबादचा 6 धावांनी पराभव केला. परंतु, विजयानंतरही आरसीबीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. हैदराबाद विरोधातील सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केलं आहे. 

हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहलीने आउट झाल्यानंतर पवेलियनमध्ये गेल्यानंतर रागात खुर्चीवर बॅट मारली. विराट कोहलीनं केलेलं हे कृत्य आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टच्या विरोधात आहे. 

आयपीएलच्या कोड ऑफ कंडक्टनुसार, खेळाडू मैदानात कोणत्याही सामानाला नुकसान पोहोचवू शकत नाही. विराट कोहलीने कोड ऑफ कंडक्ट मोडल्याची गोष्ट मान्य केली आहे. या प्रकरणी आता मॅच रेफरीला निर्णय घ्यायचा आहे. या प्रकरणी रेफरी जो निर्णय घेतील तो अंतिम असणार आहे.  

विराटचं कृत्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय 

बुधवारी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी यांच्या खेळवण्यात आलेल्या सामन्यात आरसीबीनं हैदराबादवर मात करत विजय मिळवला. या रोमांचक सामन्यात शेवटी आरसीबीचा विजय झाला. परंतु, आरसीबीचा कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर त्याची रिअॅक्शन सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. कालच्या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय आरसीबीनं घेतला. बंगलोरच्या फलंदाजांनी उत्तम खेळी केली. परंतु, कर्णधार विराट कोहली फारशी चांगली खेळी करु शकला नाही. विराट केवळ 33 धावांवर माघारी परतला. हैदराबादच्या जेशन होल्डरने विराटला माघारी धाडलं. पवेलियनमध्ये परतताना विराट कोहलीने रागात बॅटने खुर्ची पाडली. सोशल मीडियावर विराटचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडीओवर अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये विराट आऊट झाल्यानंतर रागात दिसून येत आहे. तसेच तो पवेलियनमध्ये परतल्यावर आपल्या बॅटनं एक खुर्ची जोरात पाडताना दिसतोय. विराटच्या आजूबाजूला टीममधील इतर खेळाडू आहेत. पण कोणीच विराटकडे येताना दिसत नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. तर या व्हिडीओवर नेटकरीही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, "विराटला आपल्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल." आणखी एका युजरने लिहिलं आहे की, "विराटने सांभाळून खेळायला हवं होतं." तसेच एका युजरने विराटच्या कर्णधार पदाचं कौतुक केलं. त्याने लिहिलं आहे की, "शेवटी विजय आरसीबीचाच झाला आणि विराटने या सामन्यात कर्णधार म्हणून उत्तम काम केलं."  

बंगळुरूची हैदराबादवर 6 धावांनी मात 

विराटसेनेच्या बंगळूरुने हैदराबादवर सहा धावांनी मात केली आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या झुंझार अर्धशतकाच्या बळावर बंगळुरुनं 20 षटकात 8 बाद 150 धावा केल्या होत्या. मात्र हैदराबादला बंगळुरुच्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर 143 धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरू आणि हैदराबादमधील आयपीएल सामन्यात हैदराबादनं बंगळुरुला 149 धावांवर रोखले. ग्लेन मॅक्सवेलच्या झुंझार अर्धशतकाच्या बळावर बंगळुरुनं 20 षटकात 8 बाद 149 धावा केल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे हैदराबादने बंगळुरूला दीडशेच्या आत रोखले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IPL 2021, Video : केवळ 33 धावांवर बाद झाल्यावर विराटला राग अनावर, बॅटनं पाडली खुर्ची; व्हिडीओ होतोय व्हायरल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaZero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget