IPL 2021 : आयपीएल 2021मध्ये जोफ्रा आर्चरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह? राजस्थान रॉयल्सची पहिली प्रतिक्रिया
IPL 2021 : आयपीएलच्या 14व्या सीझनला 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. अशातच आयपीएल सुरु होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत. राजस्थान रॉयल्सचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) यंदाच्या सीझनमधून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
IPL 2021 : इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनच्या सुरुवातीपूर्वी राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का लागू शकतो. राजस्थान रॉयल्सचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर ( Jofra Archer) आयपीएलच्या 14व्या सीझनमधून बाहेर पडू शकतो. सध्या जोफ्रा आर्चरच्या 14व्या सीझनमध्ये खेळण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच राजस्थान रॉयल्सने यासर्व चर्चांवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राजस्थान रॉयल्सचं म्हणणं आहे की, अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून संघ व्यवस्थापक संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
राजस्थान रॉयल्सचं म्हणणं आहे की, ते जोफ्रा आर्चरच्या यंदाच्या सीझनमध्ये खेळण्यासंदर्भातील अधिकृत वक्तव्याची वाट पाहत आहेत. राजस्थान रॉयल्सने सांगितल्यानुसार, "आम्ही जोफ्रा आर्चरच्या आयपीएलमध्ये खेळण्यासंदर्भातील अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. अद्याप आम्हाला जोफ्रा आर्चरबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही."
कोपराला झालेल्या दुखापतीने त्रस्त आर्चर
गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, जोफ्रा आर्चर आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये सहभागी होणार नाही. जोफ्रा आर्चर कोपराला झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त आहे आणि त्याने भारत दौऱ्यावर कोपराच्या दुखापतीने त्रस्त होऊन तीन इंजेक्शन घेतले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एशेज आणि वर्ड कपचा विचार करुन जोफ्रा आर्चर आयपीएलमधून माघारी घेऊ शकतो.
जोफ्रा आर्चर कोपराच्या दुखापतीमुळे टीम इंडिया विरोधातील दुसरा आणि चौथा कसोटी सामना खेळू शकला नव्हता. आर्चरला आयपीएलच्या गेल्या मोसमात आयपीएलमधील मोस्ट वॅल्यूएबल प्लेयरचा किताब मिळाला होता. आयपीएलमध्ये आर्चरने 35 सामने खेळले असून 42 विकेट्स घेतले आहेत. आर्चरचा आयपीएलमधील इकॉनॉमी रेट केवळ 7.13 एवढा आहे.
दरम्यान, जोफ्रा आर्चरने जर आयपीएलच्या 14व्या सीझनमधून माघार घेतली तर राजस्थान रॉयल्सकडे त्याच्याऐवजी रिप्लेसमेंट घेण्याचा पर्याय खुला असेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :