MI vs KKR: मुंबईचे कोलकाताला 156 धावांचे लक्ष्य; डीकॉकचं अर्धशतक
IPL 2021, KKR vs MI: क्विंटन डी कॉकने मुंबई इंडियन्ससाठी चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. तर कर्णधार रोहित शर्माने 33 धावा केल्या.
![MI vs KKR: मुंबईचे कोलकाताला 156 धावांचे लक्ष्य; डीकॉकचं अर्धशतक IPL 2021: MI given target of 156 runs against KKR in Match 34 at Sheikh Zayed Stadium MI vs KKR: मुंबईचे कोलकाताला 156 धावांचे लक्ष्य; डीकॉकचं अर्धशतक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/23/1d6645f1f886c76f288585072998c837_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: अबू धाबीच्या शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या IPL 2021 च्या 34 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा फलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्सला 156 धावांचे लक्ष्य दिले आहे. क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला चांगली सुरुवात दिली. पण, मधल्या षटकांमध्ये कोलकाताच्या फिरकीपटूंनी टिच्चून गोलंदाजी केली आणि मुंबईच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. अशा स्थितीत मुंबई इंडियन्सला 20 षटकांत सहा विकेटवर फक्त 155 धावा करता आल्या.
डिकॉकचं अर्धशतक
मुंबईसाठी डीकॉकने 42 चेंडूत 55 धावा केल्या. यादरम्यान त्याने चार चौकार आणि तीन षटकार ठोकले. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्माने 30 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 9.2 षटकांत 78 धावा जोडल्या. पण यानंतर कोलकाताच्या फिरकीपटूंनी फलंदाजांना रोखण्यात यश मिळवलं आहे.
मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने त्याच्या चार षटकांत 22 धावा दिल्या. त्याच वेळी, सुनील नरेनने चार षटकांच्या कोट्यात अवघ्या 20 धावा देऊन एक विकेट घेतली. याशिवाय नितीश राणाने एका षटकात पाच धावा दिल्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)