(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020 : मुंबईवर मात करत सनरायझर्स हैदराबादची प्लेऑफमध्ये धडक; रचला इतिहास
IPL 2020 : सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सवर मात करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद सलग पाचव्यांदा नॉकआऊट स्टेजमध्ये स्थान मिळवणारा तिसरा संघ बनला आहे.
IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनमध्ये मंगळवारी सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मुंबई इंडियन्सचा 10 विकेट्सनी पराभव केला. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सवर मात करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद सलग पाचव्यांदा नॉकआऊट स्टेजमध्ये स्थान मिळवणारा तिसरा संघ बनला आहे.
2016 मध्ये विजय मिळवल्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने शानदार खेळी केली. सनरायझर्स हैदराबादचा संघ 2016, 2017, 2018, 2019 आणि 2020 मध्ये सलग पाच वर्ष प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.
𝙌𝙪𝙖𝙡𝙞𝙛𝙞𝙚𝙙 🧡#SRHvMI #OrangeArmy #KeepRising #IPL2020 pic.twitter.com/XGe2zJKjmn
— SunRisers Hyderabad (@SunRisers) November 3, 2020
हैदराबाद व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ असे आहेत, ज्यांनी सलग पाचहून अधिक नॉकआउट स्टेज किंवा फ्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्सने 2008 मध्ये आयपीएलचा पहिला सीझन सुरु झाल्यापासून ते 2015 पर्यंत सलग 8 वेळा नॉकआऊट किंवा प्लेऑफमध्ये स्थान पटकावलं होतं. दरम्यान, यंदा पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सचा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही.
मुंबई इंडियन्सचा शानदार रेकॉर्ड
सर्वाधिक चार वेळा आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाचा रेकॉर्डही प्लेऑफ आणि नॉकआऊट स्टेजबाबत शानदार आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने सलग 6 वेळा 2010 ते 2015 पर्यंत नॉकआऊट स्टेज आणि प्लेऑफमध्ये आपली जागा निर्माण केली आहे.
दरम्यान, यंदाच्या वर्षी सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफमध्ये 6 नोव्हेंबर रोजी रॉयल चॅलेंजर बंगलोरसोबत लढणार आहे. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाला पहिल्या सामन्यात पराभव होणाऱ्या संघासोबत 8 नोव्हेंबर रोजी सामना खेळावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :