एक्स्प्लोर
Advertisement
मी पुन्हा येईन..! धोनीकडून आयपीएलच्या पुढच्या मोसमात खेळण्याचे संकेत
धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल अशी चर्चा सुरु आहे. मात्र, धोनीनेच आता या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सचा अबुधाबीतला पंजाबविरुद्धचा सामना यंदाच्या मोसमातला शेवटचा सामना ठरला. आयपीएलच्या प्रत्येक मोसमात चेन्नईनं याआधी साखळी फेरीतून कधीच गाशा गुंडाळला नव्हता. पण यंदा धोनीच्या सीएसकेवर ती नामुष्की ओढवली. यंदाच्या मोसमात कर्णधार धोनीही पूर्वीच्या फॉर्ममध्ये दिसला नाही. त्यामुळे धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल अशी चर्चा सुरु झाली होती. पण धोनीनेच आता या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
पंजाब आणि चेन्नई सामन्याआधी या नाणेफेकीचा कौल जिंकला तो कर्णधार धोनीनं. यावेळी समालोचक डॅनी मॉरिसन यांनी धोनीला हा चेन्नईच्या पिवळ्या जर्सीतला तुझा शेवटचा सामना आहे का असं विचारलं. तेव्हा धोनीनं हसत हसत "नक्कीच नाही" असं उत्तर दिलं. त्यामुळे धोनी पुढच्या मोसमातही खेळणार हे निश्चित झालं आहे.
सीएसकेंच्या सीईओंचा याआधीच खुलासा चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी याआधीच धोनीच्या पुढील मोसमात खेळण्याबाबत खुलासा केला होता. त्यांनी धोनी हा फक्त 2021च नाही तर त्यानंतरच्या मोसमातही खेळेल असं म्हटलं होतं. विश्वनाथन यांच्या त्या वक्तव्यावर आज धोनीच्या म्हणण्यानं शिक्कामोर्तब झालं. IPL 2020 KKRvsRR: राजस्थान-कोलकाता आमने-सामने; प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघाना विजय आवश्यक धोनीची यंदाची कामगिरी जेमतेमच महेंद्रसिंग धोनीला यंदा लौकीकास साजेशी कामगिरी करता आली नाही. 14 सामन्यात धोनीच्या बॅटमधून केवळ 200 धावाच निघाल्या. त्यात त्याची सरासरी होती केवळ 25. याआधीच्या मोसमात कित्येक सामने एकाहाती जिंकून देणारा धोनी यंदाच्या मोसमात मात्र कुठेच दिसला नाही. चेन्नई साखळी फेरीतूनच बाहेर चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाचा मोसम खूपच खराब राहिला. सलामीच्या सामन्यात मुंबईला हरवून दमदार सुरुवात केल्यानंतर पुढच्या सामन्यांमध्ये चेन्नईच्या कामगिरीचा आलेख हा उतरताच राहिला. त्यामुळे तीन वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नईला आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच साखळी फेरीतूनच बाहेर व्हावं लागलं.Danny Morrison : Could this be your last game in yellow ? #MSDhoni : Definitely Not!#CSK have won the toss and they will bowl first against #KXIP in Match 53 of #Dream11IPL pic.twitter.com/KhaDJFcApe
— IndianPremierLeague (@IPL) November 1, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
मुंबई
Advertisement