IPL 2020 : पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर सीएसके; ऑरेंज, पर्पल कॅप कोणाकडे?
IPL 2020 : आयपीएल 2020 मध्ये चेन्नईला 10 सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. धोनीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या संघाने आतापर्यंत केवळ तीनच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
IPL 2020 : तीन वेळा आयपीएलमध्ये चॅम्पियन ठरलेला चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएल 2020 मध्ये मात्र फारशी चांगली कामगिरी करताना दिसत नाही. सोमवारी अबूधाबी येथे राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्स संघाचा सात गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटच्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच राजस्थान रॉयल्सने कालच्या सामन्यात विजय मिळवल्यामुळे संघ 5व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आयपीएल 2020 मध्ये चेन्नईला 10 सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. धोनीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या संघाने आतापर्यंत केवळ तीनच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तसेच राजस्थान रॉयल्सनेही आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले असून सहा सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दिल्ली कॅपिटल्स पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर
सात सामने खेळल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा संघ आहे. मुंबईच्या संघाने नऊ सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आहे. ज्यांनी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दरम्यान, बंगलोरचा नेट रन रेट मुंबईपेक्षा कमी आहे. चौथ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स आहे. ज्यांनी नऊ सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब प्रत्येकी तीन सामने जिंकल्यामुळे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.
A look at the Points Table after Match 37 of #Dream11IPL pic.twitter.com/lHOAWzMdKV
— IndianPremierLeague (@IPL) October 19, 2020
केएल राहुलची धमाकेदार खेळी
केएल राहुलने यंदाच्या सीझनमध्ये 9 सामन्यांत 525 धावा करत ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवला आहे. मयंक अग्रवाल 393 धावा करत दुसऱ्या आणि डु प्लेसी 375 धावांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहे. शिखर धवन 359 धावांसोबत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर विराट कोहली 347 धावा करत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पर्पल कॅपच्या शर्यतीत रबाडाने स्वतःची परिस्थिती आधीपेक्षा जास्त मजबूत करून घेतली आहे. रबाडा 9 सामन्यांपैकी 19 विकेट्स घेत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आता मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आहे. त्यांनी 9 सामन्यांपैकी 15 विकेट्स घेतले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर किंग्स इलेव्हन पंजाब संघातील मोहम्मद शमी आहे. ज्याने 14 विकेट्स घेतले आहेत. चौथ्या क्रमांकावर जोफ्रा आर्चर आहे, त्याने आयपीएल 2020 मध्ये आतापर्यंत 13 विकेट्स घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
IPL 2020 MI vs KXIP | अफलातून क्षेत्ररक्षण, जबरदस्त फलंदाजी; दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मयंकची कमाल
आयपीएलच्या मैदानात 'रॉकस्टार' अंपायर, पश्चिम पाठक यांची अनोखी स्टाईल सोशल मीडियात ट्रेंड