एक्स्प्लोर

IPL 2020, RCB vs MI : बंगलोरसमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान; विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाचा कस

IPL 2020 चा दहावा सामना आज रॉयल चॅलेंजर बंगलोर आणि मुंबई इंडियन्समध्ये रंगणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या सीझनमधील आपला दुसरा विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्त्वाचा कस लागणार आहे.

IPL 2020 RCB vs MI, Match Preview : आयपीएल 2020 मधील 10वा सामना आज रॉयल चॅलेंजर बंगलोर आणि मुंबई इंडियन्समध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दुबईतील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. बंगलोरला आधीच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मुंबई इंडियन्सने आपला मागचा सामना जिंकला होता. या सीझनमध्ये दोन्ही संघांच्या पारड्यात एक-एक विजय आणि एक-एक पराभव आहे. त्यामुळे आज रंगणाऱ्या सामन्यात विजयाला गवसणी घालण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करताना दिसणार आहेत. तसेच आजच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यां दोन दिग्गज खेळाडूंच्या नेतृत्त्व गुणांचा कस लागणार आहे.

RCB आणि MI दोन्ही संघांची ताकद म्हणजे, त्यांचे फलंदाज. बंगलोरकडे विराट कोहली, आरोन फिंच, देवदत्त पड्डिकल, जोश फिलिप आणि एबी डिविलियर्स यांसारखे दिग्गज खेळाडू आहेत. तसेच मुंबईकडे रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, क्विंटन डिकॉक, सुर्यकुमार यादव, कीरन पोलार्ड आणि सौरभ तिवारी यांसारखे खेळाडू आहेत.

Weather Report - कसं असणार हवामान?

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यांमध्ये हवामान स्वच्छ असणार आहे. दरम्यान, खेळाडूंना येथेही भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. त्याचसोबत येथे दव अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे टॉस जिंकणाऱ्या संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

रॉयल चॅलेंजर बंगलोरचा संभाव्य संघ

रॉयल चॅलेंजर बंगलोर : देवदत्त पडिक्कल, आरोन फिंच, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, शिवम दूबे, जोश फिलिप/मोइन अली, इसुरु उदाना, वाशिंगटन सुंदर, नवदीप सैनी, उमेश यादव, और युजवेंद्र चहल.

मुंबई इंडियंसचा संभाव्य संघ

मुंबई इंडियंस : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट, जेम्स पैटिंसन, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget