एक्स्प्लोर

IPL 2020 Playoff : मुंबई, दिल्ली, बंगलोरची प्लेऑफमध्ये धडक; चौथ्या स्थानासाठी कोणता संघ पात्र?

IPL 2020 Playoff : आयपीएल 2020च्या प्लेऑफमध्ये मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने एन्ट्री घेतली आहे. आता चौथ्या स्थानी कोणता संघ बाजी मारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

IPL 2020 Playoff : मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. या सीझनमधील प्लेऑफसाठीचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार, यावरून प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानी कोणता संघ स्थान मिळवणार हे ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स अव्वल

आयपीएल 2020मध्ये नऊ सामन्यांमध्ये विजय मिळवत मुंबई इंडियन्सचा संघ अव्वल आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर आठ सामने जिंकत दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. तर तिसऱ्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ आहे. बंगलोर आणि कोलकाताच्या संघाने प्रत्येकी सात-सात सामने जिंकले आहेत. परंतु, नेट रन रेटच्या आधारावर बंगलोरचा संघ पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

हैदराबाद समोर करो या मरो परिस्थिती

प्लेऑफमध्ये जागा मिळवणारा चौथा संघ कोण असणार याचा निर्णय आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्समध्ये होणाऱ्या सामन्यात होणार आहे. हैरदाबादचा संघाने जर आज मुंबईवर मात करून विजय मिळवला तर प्लेऑफमध्ये पोहोचणाची संधी हैदराबादला मिळणार आहे. परंतु, हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला तर मात्र प्लेऑफमध्ये जाण्याची संधी कोलकाता नाईट रायडर्सला मिळणार आहे. हैदराबादने आतापर्यंत 13 सामने खेळले असून त्यापैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आता सध्या हैदराबादच्या संघाने 12 गुण कमावले आहेत. हैदराबादच्या संघाने जर आजच्या सामन्यात विजय मिळवला तर हैदराबादच्या खात्यात एकूण 14 गुण जमा होतील. सनरायजर्स हैदराबादचा नेट रन रेट रॉयल चॅलेंजर बंगलोरपेक्षा चांगला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवला तर हैदराबादचा संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहे.

मुंबईच्या विजयावर कोलकाताचं भविष्य ठरणार

जर आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादवर मात करत विजय मिळवला, तर मात्र कोलकाता नाईट रायडर्स प्लेऑफमध्ये पोहोचणार आहे. पॉईंट टेबलमध्ये सध्या केकेआरचा संघ 14 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवत 14 गुणांनुसार चौथ्या क्रमांकावर आहे.

प्ले-ऑफ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर; अशा होणार लढती

यंदा कोरोनामुळे बीसीसीआयकडून आयपीएलचं आयोजन यूएईत करण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला सुरु झालेली ही स्पर्धा 10 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जेव्हा जाहीर करण्यात आले होते, तेव्हा प्लेऑफच्या सामन्यांची ठिकाणं आणि तारखी सांगण्यात आलेल्या नव्हत्या. पण आज BCCIने या सामन्यांचे वेळापत्रक अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर केलं. त्यामुळे आयपीएलच्या तेराव्या मोसमातं आता खऱ्या अर्थाने रंगत यायाला सुरुवात झाली आहे.

5 नोव्हेंबर क्वालिफायर 1 संघ 1 विरूद्ध  संघ 2  दुबई
6 नोव्हेंबर एलिमिटर संघ 3 विरूद्ध  संघ 4 अबु धाबी
8 नोव्हेंबर क्वालिफायर 2 क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ विरूद्ध  एलिमिटर मधील विजेता संघ अबु धाबी
10 नोव्हेंबर अंतिम सामना दोन्ही क्वालिफायर विजेता संघ दोन्ही क्वालिफायर विजेता संघ

दरम्यान, महिलांच्या Women’s T20 Challenge च्या तारखाही जाहीर करण्यात आल्या असून 4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत शारजामध्ये हे सर्व सामने संध्याकाळी 7.30 वाजता खेळले जाणार आहेत. मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि स्मृी मंधाना या तीन क्रिकेटपटू संघांच्या कर्णधार असणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget