IPL 2020, RCBvsDC : दिल्लीची बंगलोरवर 6 विकेट्सनी मात, दिल्ली आणि बंगलोरचं प्ले ऑफचं तिकीट कन्फर्म
दिल्लीने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं. दिल्लीकडून शिखर धवन आणि अजिंक्य रहाणेनं अर्धशतकं झळकावली.
IPL 2020, RCBvsDC : आयपीएलच्या 55 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा 6 विकेट्सनी पराभव केला. आजच्या विजयासह दिल्लीने प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनी निर्णायक अर्धशतकी खेळी केली. दिल्लीने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं. तसेच चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर बंगलोरच्या संघालाही प्ले-ऑफचं तिकीट कन्फर्म झालं आहे.
बंगलोरने दिलेल्या 153 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब आला. सलमीवीर पृथ्वी शॉची दुसऱ्याच षटकात मोहम्मह सिराजने विकेट घेतली. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि शिखर धवनने दिल्लीचा डाव सावरला. अजिंक्य रहाणेने 46 चेंडूत 60 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि एक षटकार लगावला. तर शिखर धवनने 41 चेंडूत 54 धावा केल्या. या दरम्यान शिखर धवनने 6 चौकार लगावले. बंगलोरकडून शाहबाज अहमदने 2, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 20 षटकांत 7 गडी गमावून 152 धावा केल्या. बंगलोरकडून एबी डिव्हिलियर्सने 21 चेंडूत 35 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान त्याने 1 चौकार आणि 2 षटकार लगावले. देवदत्त पडिक्क्कलने चेंडूत 41 चेंडूत सर्वाधिक 50 धावांची शानदार खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने पाच चौकार ठोकले. त्याच्याशिवाय कर्णधार विराट कोहलीने 24 चेंडूंत 29 धावा केल्या.जोश फिलिप 12 धावा, तर शिवम दुबेने 17 धावा केल्या. दिल्लीकडून एरिक नार्जेने 3 विकेट घेतल्या. तर कागिसो रबाडाने 2 आणि रविचंद्रन अश्विनने 1 विकेट घेतली.