एक्स्प्लोर

KKR vs MI : आयपीएल 2021 मधील पहिल्या विजयाच्या शोधात MI पलटन; कोलकातावर मात करणार?

IPL 2021, KKR vs MI : आयपीएल 2021 मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मुंबई सज्ज आहे. तसेच आजच्या सामन्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे, मुंबईच्या स्टार ओपनरचा संघात पुन्हा समावेश करण्यात आला आहे.

IPL 2021, KKR vs MI : आयपीएलमध्ये आज कोलकाता आणि मुंबई यांच्यात सामना रंगणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. मुंबईचा संघ यंदाच्या सीझनमधील आपला पहिला विजय मिळवण्यासाठी आज मैदानात उतरणार आहे. पहिल्या सामन्यात आरसीबीने मुंबईचा पराभव केला होता. अशातच आज यंदाच्या सीझनमधील आपला दुसरा सामना केकेआर विरोधात खेळणार आहे. अशातच केकेआरनं हैदराबादचा 10 धावांनी पराभव केला होता. 

मुंबईसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईचा स्टार ओपनर डी कॉक आजच्या सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. डी कॉक 7 एप्रिल रोजी दक्षिण आफ्रिकाहून भारतात आला होता. त्यामुळे आयपीएलच्या नियमांनुसार, डी कॉकला सात दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहावं लागलं होतं. 13 एप्रिलला डी कॉकचा क्वॉरंटाईनचा अवधी संपत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या कोलकातासोबतच्या सामन्यात डी कॉक ओपनर बॅट्समन म्हणून मैदानावर उतरु शकतो. 

रोहित शर्मा आणि डी कॉक करु शकतो ओपनिंग 

डी कॉकच्या अनुपस्थितीत आरसीबी विरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत क्रिस लिन ओपनर म्हणून मैदानावर उतरला होता. क्रिस लिनने या सामन्यात 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 35 चेंडूंमध्ये 49 धावांची खेळी केली होती. परंतु, जर डी कॉकचा आजच्या सामन्यात संघात समावेश झाला तर मात्र क्रिस लीनला संघाबाहेर बसावं लागू शकतं. तसेच सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा आजच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. त्यानंतर इशान किशन चौथ्या क्रमांकावर, कायरन पोलार्ड पाचव्या क्रमांकावर आणि हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. 

IPL 2021 : मुंबईच्या स्टार ओपनरची संघात वापसी; तर हार्दिक पांड्याच्या खांद्यावर लवकरच मोठी जबाबदारी

तीन वेगवान गोलंदाजांना मिळू शकतं संघात स्थान 

बंगलोरच्या विरोधातील सामन्या प्रमाणेच मुंबईचा संघ या सामन्यातही तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट दोघांचाही संघात समावेश असणार आहे. तर तिसऱ्या गोलंदाजाच्या रुपात दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर मार्को जानसेनने आपला पहिल्या सामन्यात उत्तम खेळी केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात संघात त्याला संधी मिळू शकते. तसेच स्पिनर म्हणून कृणाल पांड्या आणि राहुल चहर यांच्या खांद्यावर असेल. 

मुंबई इंडियन्सचा संभाव्य संघ :

क्विन्टन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन (विकेटकीपर), कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल चहर, मार्को जानसेन, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour D Gukesh World Chess Champion : युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा 'राजा'Zero Hour Arvind Sawant : One Nation One Election विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार?Zero Hour Sharad Pawar Ajit Pawar Meet : शरद पवारांचा वाढदिवस... दादांची भेट; राष्ट्रवादीत मनोमिलन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Embed widget