एक्स्प्लोर

IPL 2020 : आजपासून IPLच्या 13व्या सीझनला सुरुवात; MI आणि CSK मध्ये सलामीचा सामना

IPL 2020 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील हायव्होलटेज लढतीने आयपीएलच्या 13व्या सीझनला आज दुबईत सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होणार आहे.

IPL 2020 : कोरोना व्हायरसमुळे अनिश्चिततेचं सावट पसरलेल्या आयपीएलच्या 13व्या सीझनला आजपासून दुबईत सुरुवात होत आहे. आयपीएलच्या इतिहासातील स्टार टीम मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीची लढत रंगणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी हायव्होलटेज सामना चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

सामना आज आबुधाबीतील शेख जायेद स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. अनेक असे खेळाडू आहेत, जे अद्याप दुबईतील मैदानांवर एकही सामना खेळलेले नाहीत. आयपीएलच्या सामन्यांमध्ये ते पहिल्यांदाच दुबईतील मैदानांमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत. अशातच इतिहासात दुसऱ्यांदा आयपीएल भारताबाहेर दुबईत खेळवण्यात येत आहे. याआधी 2009मध्ये लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलचं आयोजन भारताबाहेर दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलं होतं. तसेत 2014मध्येही लोकसभा निवडणुकांमध्ये आयपीएलचा फर्स्ट हाफ दुबईत खेळवण्यात आला होता.

IPL 2020, MI vs CSK Preview: पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधला नवा संघर्ष

29 मार्चपासून भारतात होणार होतं आयपीएलचं आयोजन

यंदाच्या आयपीएलच्या सीझनचं आयोजन भारतातच 29 मार्चपासून करण्यात येणार होतं. परंतु, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल रद्द करण्यात आलं होतं. त्यामुळे यंदाच्या वर्षी आयपीएल होणार की, नाही? हा प्रश्न उपस्थित झाला होता. यंदाच्या वर्षी होणारा टी-20 विश्व कप स्पर्धेला स्थगिती मिळाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल खेळवण्याचा निर्णय घेतला. आता यूएईतील तीन शहरं अबु धाबी, दुबई, शारजाह येथील मैदानांवर आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत.

पाहा व्हिडीओ : अबुधाबीत आयपीएलचा सलामीचा सामना, Mumbai Indians VS Chennai Super Kings पहिली लढत

आयपीएल पाहण्यासाठी यंदा प्रेक्षक नसणार

यंदा मैदानावर आपल्या आवडत्या संघाच्या घोषणा नसणार किंवा आपल्या आवडत्या खेळाडूला मारलेल्या हाका ऐकू येणार नाहीत. एखाद्या खेळाडून जर चौकार किंवा षट्कार टोलावला तर त्याच्या नावाचे जयघोष ऐकू येणार नाहीत. कारण यंदाच्या सीझनमध्ये आयपीएलच्या कोणत्याच सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली नाही. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचे सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार आहेत. परंतु, आयपीएल प्रेमींनी निराश होण्याची अजिबात गरज नाही. तुम्हाला ऑनलाईन किंवा टेलिव्हिजनवर या सामन्यांचे प्रक्षेपण पाहता येणार आहे.

IPL 2020, MI vs CSK LIVE: सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

गेल्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सने मिळवला होता विजय

गेल्या सीझनमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स आणि महेंद्र सिंह धोनी नेतृत्त्व करत असेल्या चेन्नई सुपर किंग्सचा यांच्यात अंतिम सामना रंगला होता. या हायव्होलटेज लढतील मुंबई इंडियन्सने विजयाला गवसणी घातली होती. त्यामुळे आयपीएलच्या परंपरेनुसार, या सीझनचा पहिला सामना गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्स इलेव्हन पंजाब या संघांनी अद्याप एकदाही आयपीएलचा किताब जिकलेला नाही त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये हे संघ कमाल करणार का हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget