कसोटी-वन-डे अन् टी 20 मध्ये शतक, तिघांनाच जमला कारनामा, विराट या विक्रमापासून दूरच
Indian Batsmen To Score Centuries In All Three Formats of Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक फलंदाजाची टी - 20, एकदिवसीय आणि कसोटीमध्ये शतक झळकावण्याची इच्छा असते.
Indian Batsmen To Score Centuries In All Three Formats of Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक फलंदाजाची टी - 20, एकदिवसीय आणि कसोटीमध्ये शतक झळकावण्याची इच्छा असते. या तिन्ही प्रकारात फलंदाजांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक फलंदाजाला तिन्ही प्रकाराच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावता येत नाही. तरीही काही फलंदाजांनी हा कारनामा केलाय. यामध्ये काही भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. पाहूयात कोण आहेत हे खेळाडू.....
सुरेश रैना -
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावणारा सुरेश रैना पहिला भारतीय खेळाडू आहे. रैनाने कसोटीत एक, एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक शतक लगावले आहे. सुरेश रैनाने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रैना सध्या समालोचकाच्या भूमिकेत दिसतो.
रोहित शर्मा -
विद्यमान भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावरही हा आगळावेगळा विक्रम आहे. रोहित शर्माने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावले आहे. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्वशतके झळकावण्याचा विक्रमही केलाय. तसेच टी 20 क्रिकेटमध्ये चार शतके झळकावणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू आहे. रोहित शर्मानेही 45 कसोटी सामन्यात 8 शतके झळकावली आहेत. त्याशिवाय एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या नावावर 29 शतकांची नोंद आहे.
केएल राहुल
विकेटकिपर फलंदाज केएल राहुल यानेही क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकावलेय. राहुलने टी 20 क्रिकेटमधील आपले पहिले शतक वेस्ट विंडिज विरोधात झळकावलेय. कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात शतक लगावलेय. राहुलने कसोटीत सात, एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच आणि टी 20 क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली आहेत.
या दिग्गजांना हा कारनामा जमला नाही -
भारतीय क्रिकेटमधील रनमशीन विराट कोहली, गौतम गभीर, युवराज सिंह, वीरेंद्र सेहवाग आणि ऋषभ पंत यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात अद्याप शतक झळकावता आलेली नाही. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात यांनी शतके लगावली आहेत. पण आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये यांची पाटी अद्याप कोरीच आहे. विराट कोहली आणि ऋषभ पंत यांच्याकडे भविष्यात हा पराक्रम करण्याची संधी आहे.
या दिग्गजांना