(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RCB vs RR : एक चौकार आणि कोहली गाठणार नवा 'Milestone', अशी कामगिरी करणारा दुसराच क्रिकेटपटू
मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RR vs RCB) या सामन्यात कोहली एक विशेष कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Virat Kohli Record : क्रिकेट जगतातील एक महान फलंदाज म्हणजे विराट कोहली (Virat Kohli). विराटच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. तो नवनवीन रेकॉर्ड करतच असतो. पण मागील काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला खास छाप सोडता आलेली नाही. पण सध्या सुरु असलेल्या आयपीएल (IPL 2022) सामन्यांमध्ये मात्र तो दमदार कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे. त्यात आजच्या सामन्यात तो एक चौकार ठोकताच आयपीएलमध्ये 550 चौकार पूर्ण करणार आहे.
विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो दुसराच क्रिकेटपटू होणार आहे. याआधी केवळ शिखर धवनने ही कामगिरी केली असून त्याच्या नावावर 664 चौकार आहेत. तिसऱ्या स्थानावर डेव्हिड वॉर्नर 509 चौकारांसह असून सुरेश रैना 506 आणि रोहित शर्मा 495 चौकारांसह विराजमान आहेत.
आज कोणाचं पारडं जड?
आयपीएलमध्ये आजवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्या एकमेंकाविरुद्धच्या सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी आजवर 24 सामने एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. 24 मधील 12 सामने आरसीबीने जिंकले असून 10 सामने राजस्थानने जिंकले आहेत. आज सामना होणाऱ्या प्रसिद्ध अशा वानखेडे मैदानाची खेळपट्टी पाहता एक मोठी धावसंख्या नक्कीच उभा राहू शकते. कारण वानखेडेची खेळपट्टी कायमच फलंदाजांसाठी लाभदायक ठरली असून छोट्या बाऊंड्रीस फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरतात. आजच्या सामन्यातही दव हा एक मोठा फॅक्टर ठरु शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच प्रथम गोलंदाजी घेऊ इच्छित असणार आहे.
हे देखील वाचा-
- IPL 2022, RR vs RCB : आज रंगणार बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामना, कधी, कुठे पाहाल सामना?
- RR vs RCB : राजस्थान विरुद्ध बंगळुरु सामन्यात होऊ शकतात मोठे बदल, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
- RR vs RCB, Pitch Report : बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha