Bollywood Movie Tragic Ending: बॉलिवूडचा असा सिनेमा, ज्यामुळे आयुष्य संपवायला लागलेली प्रेमी युगुलं; अगदी राज कपूर यांनीही शेवट बदलण्याची केलेली शिफार, अन् मग
Bollywood Movie Tragic Ending: बॉलिवूड सिनेमांचे समाजातील अनेक घटकांवर परिणाम होत असतात, याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. पण, एक असा सिनेमा ज्यामुळे अगदी प्रेमी युगुलं आपलं आयुष्य संपवायला लागलेली.

Bollywood Movie Tragic Ending: बॉलिवूड सिनेमे (Bollywood Movies) आणि त्याचे होणारे परिणाम, याची अनेक उदाहरणं आपण पाहिलीत. पण, तुम्हाला माहितीय का? खरं तर बॉलिवूड (Bollywood News) आणि त्यातली गाणी (Bollywood Songs), सिनेमे यांचा आपल्या समाजावर खोलवर परिणाम होत असतो. ते समाजातील कथा पडद्यावर आणतात. म्हणूनच या कथा आणि ती कथा पडद्यावर जिवंत करणारी पात्र थेट अनेकांच्या काळजाला हात घालतात.
असाच एक चित्रपट 1981 मध्ये प्रदर्शित झालेला. त्यानं चित्रपटप्रेमींवर, विशेषतः प्रेमात असलेल्यांवर खोलवर छाप सोडली. या चित्रपटात कमल हसन (Kamal Haasan) आणि रती अग्निहोत्री (Rati Agnihotri) यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. रती (Rati Agnihotri) आणि कमल हासन (Kamal Haasan) चा हा पहिला हिंदी चित्रपट होता. त्यांच्या ऑन-स्क्रीन जोडीचं खूप कौतुक झालेलं. बॉलिवूडमध्ये गाजलेल्या या सिनेमाची लव्ह स्टोरी इतकी दुःखद होती की, एकमेकांच्या प्रेमाक आकंठ बुडालेली नायक आणि नायिका आपलं आयुष्य संपवते. म्हणजेच, बॉलिवूडच्या 'हॅप्पी एन्डिग' या प्रतिमेला छेद देणारा या सिनेमाचा शेवट होता.
सिनेमाच्या शेवटाचा त्या काळी प्रेक्षकांवर इतका परिणाम झालेला की, चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलण्यासाठी त्यावेळी निर्मात्यांवरही प्रचंड दबाव टाकण्यात आलेला. राज कपूर (Raj Kapoor) यांनी चित्रपट पाहिला, तेव्हा त्यांनी दिग्दर्शक बालचंदर (K. Balachander) यांना शेवट बदलण्यास सांगितलं, पण दिग्दर्शकाला कथा जशी आहे, तशीच प्रदर्शित करायची होती. त्यांचा सिनेमात कोणताही बदल करायला विरोध होता. या सिनेमातं नाव होतं, 'एक दुजे के लिए' (Ek Duuje Ke Liye). हा सिनेमा बालचंदर (K. Balachander) यांचा तेलुगू चित्रपट 'मारो चरित्र'चा हिंदी रिमेक होता. प्रदर्शित होताच या चित्रपटानं खळबळ उडवून दिलेली. या सुपरहिट चित्रपटानं त्या वर्षी तीन फिल्मफेअर पुरस्कारही जिंकलेले.
फिल्म एक इंटर कल्चरल लव्ह स्टोरी होती. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेलं प्रेमी युगुल आपलं प्रेम सार्थकी न लागल्यामुळे आत्महत्येचा निर्णय घेतात. त्या काळात फिल्मनं धुमाकूळ घातलेला. बॉक्स ऑफिसवर तर फिल्मनं छप्पडफाड कमाई केली. पण, फिल्म ब्लॉकबस्टर ठरत असल्याच्या बातम्यांसोबतच काही अस्वस्थ करणाऱ्या बातम्याही समोर आल्या. त्याकाळी, प्रेमात बुडालेल्या आणि नैराश्यात असलेल्या अनेकांनी आत्महत्या करायला सुरुवात केलेली. असंख्य आत्महत्यांच्या बातम्यांमुळे निर्मात्यांमध्येही चिंतेचं वातावरण निर्णाण झालेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























