Building On Name Of Shah Rukh Khan: किंग खानच्या फॅन फॉलोइंगचा नाद खुळा, शाहरुख खानच्या नावानं बांधतायत 4000 कोटींची बिल्डिंग; एका फ्लॅटची किंमत किती?
Building On Name Of Shah Rukh Khan: नुकताच मुंबईत एक इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये शाहरुख खान उपस्थित होता. याच इव्हेंटमध्ये शाहरुख खाननं त्याच्या नावानं बांधल्या जाणाऱ्या 'शाहरुख्ज डेन्यूब' नावाच्या इमारतीचं उद्घाटन केलंय.

Building On Name Of Shah Rukh Khan: बॉलिवूडचा (Bollywood News) किंग शाहरुख खानची (Shah Rukh Khan) क्रेझ फक्त देशातच नाहीतर, संपूर्ण जगभरात आहे. ज्यावेळी शाहरुखचे सिनेमे रिलीज होतात, त्यावेळी देशातील बॉक्स ऑफिस (Box Office) हादरतंच, पण वर्ल्ड वाईल्ड कलेक्शनचाही (World Wild Collection) पाऊस पडतो. अरब देशांमध्ये (Arab Countries) तर शाहरुख खानच्या फिल्म्सचे कित्येक फॅन्स आहेत. तुम्हाला शाहरुखच्या फॅन फॉलोइंगचं उदाहरण द्यायचं झालं तर, शाहरुखच्या नावानं तब्बल 4000 कोटींची बिल्डिंग उभारली जातेय. तब्बल 56 माळ्यांचा या टॉवरमध्ये कित्येक अॅमिनिटीज असणार आहेत. किंग खानच्या नावानं बांधली जात असलेली ही बिल्डिंग कुठे उभारली जातेय, हे माहितीय का?
नुकताच मुंबईत एक इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये शाहरुख खान उपस्थित होता. याच इव्हेंटमध्ये शाहरुख खाननं त्याच्या नावानं बांधल्या जाणाऱ्या 'शाहरुख्ज डेन्यूब' (Shahrukhz by Danube) नावाच्या इमारतीचं उद्घाटन केलंय. इमारतीचे शिल्पकार रिझवान साजन देखील उपस्थित होते. रिझवान साजन यांनी दुबईमध्ये शाहरुख खानच्या नावानं इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. शाहरुख खान त्यांच्या नावानं बांधल्या जाणाऱ्या इमारतीबद्दल खूप आनंदी आहे.
शाहरुख म्हणाला की, "जर माझी आई आज असती तर तिला खूप आनंद झाला असता. हा एक मोठा सन्मान आहे... जेव्हा माझी मुलं येतील, तेव्हा मी त्यांना सांगेन, 'ते पाहा, त्यावर तुमच्या वडिलांचं नाव लिहिलंय. ही बाबांची बिल्डिंग आहे. मी कधीही कोणत्याही गोष्टीचं नाव, स्वतःच्या नावावर ठेवत नाही. माझी कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आहे आणि माझं घर मन्नत आहे... मी स्वतःला इतकं महत्त्व देत नाही की, मी वस्तू घेईन आणि त्यावर माझं नाव लावेन... फक्त एखादा चित्रपट वगळता, कारण ते माझं काम आहे आणि ते माझ्यासाठी ईश्वरासमान आहे..."
View this post on Instagram
कशी असेल 'शाहरुख्ज डेन्यूब'?
शाहरुखच्या नावानं बांधण्यात येणारी ही इमारत, 'शाहरुख्ज डेन्यूब', हा एक व्यावसायिक टॉवर आहे, जो 2029 पर्यंत बांधून पूर्ण होईल. या मालमत्तेची किंमत सुमारे 4,000 कोटी असण्याचा अंदाज आहे. या टॉवरमध्ये 56 मजले असतील. मुस्लिम देशात पहिल्यांदाच मुस्लिम अभिनेत्याचा पुतळा बसवणं हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. टॉवरमध्ये हेलिपॅड आणि स्विमिंग पूल देखील असेल.
'शाहरुख्ज डेन्यूब'मध्ये काय सुविधा असणार?
शाहरुख खानच्या नावानं बांधण्यात येणारी ही इमारत 2029 पर्यंत पूर्ण होईल. त्याची किंमत सुमारे 4,000 कोटी रुपये असेल. या इमारतीत 56 मजले असतील, ज्यामध्ये हेलिपॅड आणि स्विमिंग पूल असेल. संपूर्ण इमारत 10 लाख चौरस फूट जागेत बांधली जाईल.
दरम्यान, डेन्यूब प्रॉपर्टीज ही दुबईतील एक प्रमुख रिअल इस्टेट कंपनी आहे. ज्याची स्थापना रिझवान साजन या भारतीयानं केली आहे. रिझवान साजन अलिकडेच 'बिग बॉस 19' मध्ये डेन्यूबचं प्रमोशन करताना दिसलेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























