RCB vs RR, Pitch Report : बंगळुरु विरुद्ध राजस्थान सामन्यात कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात पुण्यातील एमसीए स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे.
RCB vs RR, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असून दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी तशी कमाल आहे. त्यामुळे त्यांचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित झालं असलं तरी त्यांना आज विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानने 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुणांसह तिसरं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे बंगळुरुचा संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी 8 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन पाचवं स्थान मिळवलं आहे. दोघांचा फॉर्म चांगला असल्याने आजचा सामनाही रोमहर्षक होऊ शकतो.
आजवर रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) हे संघ तब्बल 26 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता बंगळुरुचं पारडं काहीसं जड राहिलं आहे. त्यांनी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर राजस्थानने 10 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे. याशिवाय तीन सामने अनिर्णीत राहिले आहेत.
बंगळुरु विरुद्ध राजस्थान अशी असेल ड्रीम 11 (RCB vs RR Best Dream 11)
विकेटकीपर- दिनेश कार्तिक, संजू सॅमसन, जोस बटलर
फलंदाज- फाफ डु प्लेसीस, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल
ऑलराउंडर- ग्लेन मॅक्सवेल, शिमरॉन हेटमायर.
गोलंदाज-प्रसिध कृष्णा, हर्षल पटेल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना होणाऱ्या पुण्यातील एमसीए मैदानात मागील काही सामने न झाल्यामुळे खेळपट्टी आज चांगली असल्याचं दिसून येत आहे. दिल्ली संघात कोरोनाच्या शिरकावामुळे त्यांचे सामने पुण्यातून मुंबईत घेण्यात आले. त्यामुळे काहीशा चांगल्या स्थितीत असणाऱ्या पुण्याच्या मैदानात आज होणारा सामना चुरशीचा होऊ शकतो. यंदाच्या हंगामात बहुतांश संघानी दुसऱ्यांदा फलंदाजी करताना विजय मिळवला आहे. त्यामुळे आजही नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.
हे देखील वाचा-