एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

KKR vs RR : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात उमेश यादवकडे पहिल्या स्थानावर पोहोचण्याची सुवर्णसंधी, चहलला देऊ शकतो मात

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : कोलकाता आणि राजस्थान यांच्यात आज होणाऱ्या सामन्यात उमेश यादव चहलला मागे टाकू शकतो त्यासाठी त्याला खास कामगिरी करणं गरजेचं आहे.

Umesh Yadav in IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यातील आजच्या सामन्यात उमेश यादवकडे अवघ्या 5 विकेट्स घेतल्यास पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर पोहोचण्याची सुवर्णसंधी आहे. यामुळे तो युझवेंद्र चहलला मागे टाकू शकतो. सध्या चहल त्याच्या जादूई फिरकी गोलंदाजीच्या जोरावर आयपीएल गाजवत असून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीतही तो अव्वल क्रमांकावर आहे. टीम इंडियामधून विश्वचषकाच्या संघात वगळला गेल्यानंतर चहल आता पुन्हा एकदा कमाल फॉर्ममध्ये असून उमेशही चांगली कामगिरी करत आहे.

केकेआरने 9 पैकी 3 सामने जिंकल्याने ते आठव्या स्थानावर आहेत. तर दुसरीकडे राजस्थान संघाने आतापर्यंत 9 पैकी 6 सामने जिंकत गुणतालिकेत तिसरं स्थान मिळवलं आहे. त्यात आज दोन्ही संघात सामना होणार असून आतापर्यंतच्या इतिहासाचा विचार करता कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) हे संघ 26 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांत कोलकात्याने 13 वेळा तर राजस्थानने 12 वेळा सामना जिंकला आहे. तर एक सामना अनिर्णीत सुटला आहे. त्यामुळे आजचा सामनाही चुरशीचा होऊ शकतो. अशात उमेश यादव आणि चहल हे आपआपल्या संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू असल्याने त्यांच्यातही आज एक वेगळी चुरस असणार आहे.

आयपीएल 2022 मध्ये उमेश यादवने 9 सामने खेळत त्यात 14 विकेट्स घेतले आहेत. यावेळी 23 रन देत 4 विकेट्स घेणं त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन असून चहलने 9 सामन्यात 19 विकेट्स घेतले आहे. 40 रन देत 5 विकेट्स घेणं हे चहलचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन असून आज दोघांपैकी कोण किती विकेट्स घेणार यानंतर पुढील आकडेवारी स्पष्ट होईल. याशिवाय कुलदीप यादवने दिल्लीकडून 9 सामन्यात 17 आणि हैदराबादकडून नटराजननेही 17 विकेट्स घेतल्या आहेत.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget