SRH vs RR, Head to Head : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्सची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
IPL 2022 : हैदराबाद आणि राजस्थान या दोन्ही संघासाठी मागील आयपीएलचं पर्व खास ठरलं नाही. त्यामुळे आता यंदातरी ते कमाल करणार का? पाहावे लागेल.
SRH vs RR : आयपीएल 2022 (IPL 2022) चा पाचवा सामना आज सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) असा रंगणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम अर्थात एमसीए मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. हैदराबाद आणि राजस्थान दोन्ही संघ आजच्या सामन्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहेत. दरम्यान दोन्ही संघामध्ये आजच्या सामन्यापूर्वी याआधीचा रेकॉर्डवर एक नजर फिरवूया...
हैदराबाद विरुद्ध राजस्थान Head to Head
आयपीएलच्या 15 सामन्यात आजवर सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने आले आहेत. या 15 सामन्यांपैकी सनरायजर्स हैदराबादने 8 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सने 7 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोघांमध्ये आजवर तरी अटीतटीची लढत दिसून आली आहे. ज्यामुळे आजचा सामनाही चुरशीचा होणार यात शंका नाही. मागील सीजनचा विचार करता दोन सामने या संघामध्ये आपआपसांत झाले होते. ज्यात दोघांनी एक-एक सामना जिंकला होता.
या खेळाडूंवर असेल साऱ्यांची नजर
राजस्थान रॉयल्स संघाचा विचार करता जोस बटलर, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर या स्फोटक फलंदाजांवर सर्वांची नजर असेल. तर गोलंदाजीत युझवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि नवदीप सैनीची कामगिरी पाहण्याजोगी असेल. दुसरीकडे हैदराबाद संघाचा विचार करता राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन आणि कर्णधार केन विल्यमसन यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल. तर मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर गोलंदाजीची भिस्त असेल.
हे देखील वाचा-
- IPL 2022, SRH vs RR : राजस्थान विरुद्ध हैद्राबाद आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना?
- IPL 2022: 'आरसीबीने मला विचारलेही नाही...' युजवेंद्र चहलच्या भावनांचा फुटला बांध
- IPL 2022, GT vs LSG : गुजरातची विजयी सलामी, लखनौचा पाच गड्यांनी पराभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha