GT vs SRH, Pitch Report : गुजरात आणि हैदराबाद आमने-सामने; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
आयपीएलमध्ये (IPL 2022) आज गुणतालिकेत भक्कम स्थानी असणाऱ्या गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघामध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानात सामना खेळवला जाणार आहे.
GT vs SRH, Pitch Report : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज गुजरात टायटन्स संघ विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (GT vs SRH) हे दोन्ही संघ आमने-सामने येणार असून दोन्ही संघाची आतापर्यंतची कामगिरी तशी कमाल आहे. त्यामुळे त्यांचं पुढील फेरीत पोहोचणं जवळपास निश्चित झालं असलं तरी त्यांना आज विजय मिळवणं महत्त्वाचं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातने 7 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन तिसरं स्थान मिळवलं आहे. दोघांचा फॉर्म चांगला असल्याने आजचा सामनाही रोमहर्षक होऊ शकतो.
गुजरात विरुद्ध हैदराबाद अशी असेल ड्रीम 11 (GT vs SRH Best Dream 11)
विकेटकीपर- निकोलस पूरन, रिद्धिमान साहा
फलंदाज- राहुल त्रिपाठी, केन विल्यमसन, शुभमन गिल, डेविड मिलर
ऑलराउंडर- राहुल तेवतिया
गोलंदाज-राशिद खान, मार्को जेन्सन, मोहम्मद शमी, टी. नटराजन
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना होणाऱ्या मुंबईतील वानखेडे मैदानातील सीमारेषा पाहता मोठा स्कोर उभा राहण्याची शक्यता आहे. त्यात मागील काही सामन्यांपासून प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी होताना दिसत आहे. पण आजचा सामना सायंकाळी असल्याने दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला दवाची अडचण होऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी देखील घेऊ शकतो. नेमका निर्णय हा सायंकाळी नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल.
हे देखील वाचा-