एक्स्प्लोर

GT vs LSG : भावाने घेतली भावाची विकेट, कृणालने हार्दिकला बाद करताच दिली हटके रिएक्शन, पाहा व्हिडीओ

राहुल तेवातियाच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर गुजरातने पाच गड्यांनी लखनौवर विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघात चांगलीच चुरस पाहायला मिळाली.

Krunal Pandya Out Hardik Pandya: मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडलेल्या आयपीएल 2022 च्या (IPL 2022) चौथ्या सामन्यात लखनौकडून खेळणाऱ्या कृणाल पंड्याने त्याचाच भाऊ आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला बाद केलं. दरम्यान या विकेटनंतर कृणाल, हार्दिक तसंत हार्दिकची पत्नी नताशा अशा साऱ्यांच्याच रिएक्शन्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

संघाला विजयाची गरज असताना हार्दिक कर्णधार म्हणून उत्तम खेळी करत होता. त्याने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान हार्दिकने 28 चेंडूत 33 धावा केल्या असतानाच कृणालच्या एका चेंडूवर हार्दिकने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडूचा बॅटशी नीट संपर्क झाला नसल्याने हार्दिक झेलबाद झाला. पण यावेळी कृणालने आनंद साजरा न करता एक स्मितहास्य दिल्याचं पाहायला मिळालं. तर हार्दीक मात्र कमालीचा निराश झाला होता. 

चुरशीच्या सामन्यात गुजरात विजयी

प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौकडून अष्टपैलू दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावार लखनौ संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या. मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यानंतर लखनौ संघाचा डाव कोसळला होता. आघाडीची फळी कोसळल्यानंतर दीपक हुड्डा आणि आयुष बडोनी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावार लखनौ संघाने सन्माजनक धावसंख्या उभारली. दीपक हुड्डाने आपल्या अर्धशतकी खेळीत 2 षटकार आणि सहा चौकार चोपले. तर आयुष बडोनी याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. बडोनीने 41 चेंडूत ताबडतोड 54 धावांची खेळी केली.  गुजरातकडून शमी सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. शमीने तीन विकेट घेतल्या. तर वरुण वरुण अरोन याने दोन विकेट घेतल्या. तर राशिद खानला एक विकेट मिळाली. 

लखनौने दिलेल्या 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली होती. सलामी फलंदाज शुभमन गिल शुन्य धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर आलेला विजय शंकरही सहा धावा काढून माघारी परतला. मॅथ्यू वेड आणि हार्दिक पांड्या यांनी डाव सावरला पण मोक्याच्या क्षणी दोघेही बाद झाले. हार्दिक पांड्या 33 आणि मॅथ्यू वेडने 30 धावा केल्या. मिलर आणि राहुलने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी भागिदारी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर आवेश खानने मोक्याच्या क्षणी मिलरला बाद केले. मिलरने 30 धावांची खेळी केली. त्यानंतर राहुल तेवातिया आणि युवा अभिनव मनोहर यांनी गुजरतला विजय मिळवून दिला. लखनौकडून दुषंता चमिराने  सर्वाधिक दोन विकेट घेतल्या तर आवेश खान, क्रृणाल पांड्या, दीपक हुड्डा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Telly Masala : मिर्झापूर-3  किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते  'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मिर्झापूर-3 किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve Mumbai : विधान परिषदेतील आक्षेपार्ह वक्तव्यावरून अंबादास दानवेंची दिलगीरीCM Eknath Shinde On Rahul Gandhi : हिंदू संयमी; योग्यवेळी राहुल गांधींना उत्तर मिळेल - एकनाथ शिंदेUruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवलाVishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Telly Masala : मिर्झापूर-3  किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते  'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मिर्झापूर-3 किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Embed widget