CSK vs RCB, Pitch Report : चेन्नईसमोर आज बंगळुरुचं आव्हान; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?
चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (CSK vs RCB) या दोन संघात पार पडणाऱ्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती आणि कोणते दमदार खेळाडू खेळतील यावर नजर फिरवूया...
CSK vs RCB, Pitch Report : आयपीएलच्या (IPL 2022) इतिहासातील एक सर्वात यशस्वी संघापैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सशी (CSK vs RCB) अवस्था यंदा मात्र खराब दिसत आहे. त्यानी चार पैकी चार सामना गमावले असल्याने ते गुणतालिकेतही (Points Table) सर्वात शेवटच्या स्थानावर आहेत. त्याउलट आरसीबी (RCB) मात्र यंदा कमाल फॉर्ममध्ये दिसत असून पहिला सामना गमावल्यानंतर त्यांना लागोपाठ तीन सामना जिंकत गुणतालिकेतही तिसरं स्थान मिळवलं आहे.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना पार पडणाऱ्या नवी मुंबईतील डी.वाय.पाटील मैदानात (DY Patil Stadium) आजही नाणेफेक जिंकणारा सामना नक्कीच गोलंदाजी निवडेल. कारण सामना सायंकाळी असल्याने दवाची अडचण होण्याची दाट शक्यता आहे. त्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यात संघाकडून चांगला स्कोर होताना पाहायाला मिळत आहे. अगदी मोठा नाही तर अगदी कमीही नाही, आव्हानात्मक स्कोर उभा होत असल्याने सामने चुरशीचे होत आहेत. त्यात आजचा सामना असणारे दोन्ही संघ दमदार असल्याने आजचा सामना क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणी असेल.
चेन्नई विरुद्ध बंगळुरु अशी असेल ड्रीम 11 (CSK vs RCB Best Dream 11)
विकेटकीपर- दिनेश कार्तिक
फलंदाज- ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अनुज रावत, फाफ डु प्लेसीस
ऑलराउंडर- रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्राव्हो, वानिंदू हसरंगा, ग्लेन मॅक्सवेल
गोलंदाज- आकाश दीप, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या इतर बातम्या
SRH vs GT : हैदराबादच्या नवाबांचा विजय, गुजरातचा पहिला पराभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha