IPL 2024 : भर मैदानात फ्लाईंग किस देणाऱ्या क्रिकेटपटूवर मोठी कारवाई, एक सामन्यासाठी बंदी!
KKR vs DC, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या हंगामात नियमाचा भंग केल्याप्रकरणी कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) खेळाडूवर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
KKR vs DC, IPL 2024 : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएल 2024 च्या हंगामात नियमाचा भंग केल्याप्रकरणी कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) खेळाडूवर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) याच्यावर आयपीएलच्या नियमांचं उल्लंघन (IPL Code of Conduct) केल्याप्रकरणी एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय हर्षित राणा याला सामन्याच्या मानधानाची 100 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली आहे. दिल्लीविरोधातील सामन्यात विकेट घेतल्यानंतर हर्षित राणानं केलेले सेलिब्रेशन अंगलट आले आहे. हर्षित राणा याच्यावर आयपीएलनं दंडात्मक कारवाई केली आहे.
29 एप्रिल रोजी ईडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आमना सामना झाला. कोलकात्यानं घरच्या मैदानावर एकतर्फी विजय मिळवला. पण कोलकात्याचा युवा गोलंदाज हर्षित राणा याला मात्र दंडात्मक कारवईला सामोरं जावं लागत आहे. दिल्लीविरोधात विकेट घेतल्यानंतर हर्षित राणानं अभिषेक पोरेल याला तंबूत धाडलं. त्यानंतर त्यानं फ्लाईंग किस देत जोरदार सेलिब्रेशन केले. याचा फटका त्याला बसलाय. आयपीएल नियम आर्टिकल 2.5 चं हर्षित राणानं उल्लंघन केल्याचं कमिटीच्या लक्षात आलं. हर्षित राणान लेवल एक चं उल्लंघ केल्याचं आयपीएलनं सोशल मीडियाद्वारे सांगितलेय. हर्षितने आपली चूक मान्य केली आहे. हर्षित राणा याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय सामन्याच्या 100 टक्के मानधन दंडाची रक्कम म्हणून त्याला भरावी लागणार आहे. दरम्यान, हर्षित राणा याला याआधी आशाचप्रकारच्या सेलिब्रेशनमुळे आयपीएलकडून ताकीद देण्यात आली होती. पण पुन्हा एकदा तशीच चूक केल्यामुळे आता दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पाहा हर्षित राणाचं सेलिब्रेशन-
Harshit Rana was going to give a flying kiss send off then he might have remembered about the fine he got in the first half of the tournament. 😄👌 pic.twitter.com/wK2ipGQrk5
— Johns. (@CricCrazyJohns) April 29, 2024
हर्षितचा भेदक मारा, कोलकात्याचा विजय -
ईडन गार्डन मैदानावर झालेल्या सामन्यात कोलकात्यानं दिल्लीचा सात विकेटनं पराभव केला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 153 धावांपर्यंत मजल मारली होती. दिल्लीला रोखण्यात हर्षित राणा याचा सिंहाचा वाटा होता. हर्षित राणा यानं चार षटकात फक्त 29 धावा खर्च करत दोन फलंदाजांना तंबूत धाडलं होतं. पण त्यानंतर केलेले सेलिब्रेशनच्या त्याच्या अंगलट आले आहे. दिल्लीने दिलेले 154 धावांचे आव्हान कोलकात्यानं तीन विकेटच्या मोबदल्यात 21 चेंडू राखून सहज पार केले.