Harshal Patel Sister Death : 'जीवनातील प्रत्येक सुख-दु:खात तुझी आठवण येईल', बहिणीच्या निधनानंतर हर्षल पटेलची भावुक पोस्ट
Harshal Patel : आरसीबी संघाचा स्टार गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं आहे.
Harshal Patel : रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या (Harshal Patel) बहिणीचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. हर्षल 9 एप्रिलला मुंबई विरुद्ध सामना खेळत असतानाच ही बातमी आली होती. त्यामुळे सामना झाल्यानंतर तो त्वरीत त्याच्या घरी परतला. दरम्यान यानंतर आता तो पुन्हा संघासोबत सामिल झाला असून शनिवारी दिल्लीविरुद्ध त्याने सामनाही खेळला. या सामन्यानंतर त्याने त्या बहिणीबाबत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
हर्षलने इन्स्टाग्रामवर त्याचा बहिणीसोबतचा फोटो शेअर करत त्याच्यासोबत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. या त्याने लिहिलं आहे, 'तू आमच्या जीवनातील एक अगदी हसतमुख व्यक्तीमत्त्व होती. तू मोठमोठ्या संकटाना देखील हसत सामोरं गेलीस. अखेरच्या श्वासापर्यंत तू हेच केलस. मी भारतात येण्यापूर्वी तुझ्यासोबत हॉस्पीटलमध्ये असताना देखील तू मला माझी काळजी न करता खेळावर लक्ष दे असं म्हणाली होतीस. त्यामुळेच मी पुन्हा मैदानावर उतरु शकलो आहे. तुला माझा अभिमान वाटावा असं मी सारं करेन, आणि जीवनातील प्रत्येक सुख-दु:खात तुझी आठवण येईल, भावपूर्ण श्रद्धांजली'
मागील दोन हंगामात हर्षलने आरसीबी संघाकडून खेळताना अप्रतिम प्रदर्शन केलं आहे. त्याने मागील स्पर्धेत तर पर्पल कॅप देखील मिळवली होती. हर्षल पटेलने आजवर आयपीएलमध्ये 67 सामन्यात आतापर्यंत 84 विकेट्स घेतले आहेत. या दरम्यान एका सामन्यात 27 धावा देत 5 विकेट्स घेणं हे त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे. याशिवाय हर्षलने 8 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 11 विकेट्स देखील घेतल्या आहेत. मागील वर्षी त्याने 15 सामन्यात 32 विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली होती. यंदाही तो दमदार कामगिरी करताना दिसत आहे.
हे देखील वाचा-
- Harshal Patel Sister Death : आरसीबीचा स्टार गोलंदाज हर्षल पटेलच्या कुटुंबावर शोककळा, मुंबईविरुद्ध सामना सुरु असताना बहिणीचे निधन
- Covid-19 Hits IPL 2022 : आयपीएलवर पुन्हा कोरोनाचं संकट, दिल्लीच्या खेळाडूला बाधा, आगामी सामन्यासाठी पुण्यालं जाणं रद्द
- DC vs RCB : कार्तिक-मॅक्सवेलची फटकेबाजी, हेजलवूडचा भेदक मारा, आरसीबीचा दिल्लीवर विजय